टीईटी घोटाळा : 7,800 नापास उमेदवारांना पैसे घेऊन केलं पास; समोर आली धक्कादायक माहिती
राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून तिन्ही परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, टीईटी घोटाळ्यातील आरोपींनी तब्बल पात्र नसलेल्या 7,800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं आहे. हेच अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत. राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या […]
ADVERTISEMENT
राज्यात उघडकीस आलेल्या टीईटी घोटाळा प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून तिन्ही परीक्षांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराचा तपास सुरू असून, टीईटी घोटाळ्यातील आरोपींनी तब्बल पात्र नसलेल्या 7,800 उमेदवारांना पैसे घेऊन पास केलं आहे. हेच अपात्र शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिक्षण पात्रता परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं. 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षण पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या म्हणजेच नापास झालेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना अनुत्तीर्ण झाल्यानंतर पैसे घेऊन पास करण्यात आलं आहे. पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून ही माहिती उजेडात आली आहे.
आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी परीक्षा अन् कोट्यवधींचा भ्रष्टाचार; पोलिसांना आतापर्यंत काय सापडलं?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
2019-20 मध्ये TET पेपर-1 ची 1 लाख 88 हजार 688 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. तर पेपर दोनसाठी 1 लाख 54 हजार 596 उमेदवार उपस्थित होते.
परीक्षा दिलेल्यांपैकी जवळपास 16 हजार परीक्षार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी या सर्व प्रमाणपत्रांची पडताळणी केली. यात चक्रावून टाकणारी माहिती पोलिसांना मिळाली. परीक्षेत तब्बल 7 हजार 800 जण अपात्र म्हणजेच नापास झाले होते. या नापास झालेल्यांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.
ADVERTISEMENT
तुकाराम सुपेच्या घरातून मिळालं ‘इतक्या’ कोटींचं घबाड
ADVERTISEMENT
या प्रकरणाची सर्व माहिती पुणे पोलीस आता महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद आणि राज्य सरकारला देणार आहे. त्याचबरोबर 2018 मध्येही झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेतले असून, त्याची पडताळणी सुरु असल्याचं पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तां यांनी सांगितलं आहे.
पैसे देऊन पात्रता यादीत नाव घुसवणाऱ्या या 7800 शिक्षकांच्या नोकरी आता धोक्यात आल्या आहेत. पोलिसांकडून अहवाल गेल्यानंतर या शिक्षकांवर सरकारकडून बडतर्फीची कारवाई केली जाऊ शकते.
TET Exam Scam : माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह दोघांना अटक; बीडमधील एकाला बेड्या
आतापर्यंत आरोग्य भरती तसेच TET परीक्षा गैरव्यवहारात दाखल झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये तब्बल 40 जणांना अटक करण्यात आली आहे. तर टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जीए टेक्नॉलॉजीचा अश्विन कुमार, सौरभ त्रिपाठी, डॉ. प्रीतिश देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्या चौकशीतून नवी माहिती समोर येत आहे.
ADVERTISEMENT