Mansukh Hiren प्रकरणात ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवतं आहे-राणे

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाकरे सरकार सचिन वाझेंना वाचवू पाहतं आहे असा आरोप भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसंच मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना वाचवलं जात असल्याचाही आरोप नारायण राणे यांनी केला.

ADVERTISEMENT

मनसुख हिरेन प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सचिन वाझेंना का वाचवलं जातं आहे? सुशांतचा मृत्यू, दिशा सालियन मृत्यू, पूजा चव्हाण प्रकरण या सगळ्यामध्ये हत्या होऊनही आत्महत्या जाहीर करण्यात आली. आता मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांना वाचवलं जातं आहे असाही आरोप नारायण राणे यांनी केला.

Antilia ते सचिन वाझे व्हाया मनसुख हिरेन, आजवर काय-काय घडलं?

हे वाचलं का?

राज्यात कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. मुकेश अंबानींसारखा जगप्रसिद्ध उद्योगपती त्यांना धमकी दिली जाते. त्यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार मिळूनही काहीही शोध लागत नाही. सचिन वाझे तिथे नेमके कसे काय पोहचले? स्कॉर्पिओ मालक मनसुखची हत्या कशी काय झाली? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं ठाकरे सरकारला देता आलेली नाहीत असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

ADVERTISEMENT

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला एक संशयित स्कॉर्पिओ आढळली होती. या स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीनच्या कांड्या आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मागच्या शुक्रवारी या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. सकाळी १० वाजून २५ मिनीटांनी हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येखील खाडीतून बाहेर काढण्यात आला. रात्री उशीरा हिरेन यांच्या मृतदेहावर पोस्ट मार्टम पूर्ण करण्यात आलं.

ADVERTISEMENT

घटनेच्या एक दिवस आधी म्हणजेच ४ मार्चला मनसुख हिरेन रात्री ८ वाजून २० मिनीटांनी घराबाहेर पडले. यानंतर रात्रभर मनसुख घरी परतलेच नाही. चिंतेत पडलेल्या परिवारातील सदस्यांनी थोडावेळ वाट पाहण्याचं ठरवलं. परंतू दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मार्चला दुपारपर्यंत मनसुख यांचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे अखेरीस कुटुंबाने नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सकाळी सव्वा दहा वाजल्याच्या सुमारास हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT