OBC समाजाची फसवणूक आणि विश्वासघात ठाकरे सरकारने थांबवावा-फडणवीस

मुंबई तक

OBC समाजाची फसवणूक विश्वासघात करणं ठाकरे सरकारने थांबवावं असं आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. मंत्री म्हणतात की हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाहीत तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. हा ओबीसी समाजाचा विश्वासघात आणि फसवणूक आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

OBC समाजाची फसवणूक विश्वासघात करणं ठाकरे सरकारने थांबवावं असं आता देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. मंत्री म्हणतात की हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाहीत तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाहीत आणि दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर होतात. हा ओबीसी समाजाचा विश्वासघात आणि फसवणूक आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या सरकारने ओबीसी समाजाचा विश्वासघात करणं बंद केलं नाही तर आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच OBC समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात-फडणवीस

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. त्यानंतर राज्य सरकारने वारंवार आश्वस्त करुन याबाबत कारवाईचं आश्वासन दिलं. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही. कुठल्याही परिस्थितीत सरकारने हस्तक्षेप करुन या निवडणुका रद्द केल्या पाहिजेत. या निवडणुका रद्द केल्या नाहीत तर उग्र आंदोलन भाजप करेल, असा इशारा मी राज्य सरकारला देतोय. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचा विश्वासघात बंद करा, असं माझं राज्य सरकारला आवाहन आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील ओबीसींचं राजकीय आरक्षण संपलं. त्यानंतर राज्य सरकारने वारंवार आश्वस्त करुन याबाबत कारवाईचं आश्वासन दिलं. ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं की निवडणुका होऊ देणार नाही, आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या निवडणुका जाहीर होतात, हा एक प्रकारचा ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट सरकारकडून घातला जातोय. हे आम्ही सहन करणार नाही.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 19 जुलै रोजी मतदान होणार असून 20 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp