उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडिया अकाउंटसाठी ठाकरे सरकार खर्च करणार तब्बल 6 कोटी

मुंबई तक

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आलं आहे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाटच आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या (deputy chief minister office) प्रसिद्धीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिमा उजळविण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) अकाउंट्स सांभाळण्याासाठी तब्बल 6 कोटी रुपये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) लॉकडाऊन आणखी 15 दिवसांनी वाढवण्यात आलं आहे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाटच आहे. अशावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या (deputy chief minister office) प्रसिद्धीसाठी तब्बल सहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची प्रतिमा उजळविण्यासाठी सोशल मीडिया (Social Media) अकाउंट्स सांभाळण्याासाठी तब्बल 6 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे. याबाबतचा जीआर (GR) देखील सामान्य प्रशासनने जारी केला आहे. ज्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, 6 कोटीची (Spend Rs 6 crore) रक्कम ही एका वर्षासाठी राखीव ठेवण्यात येत आहे.

कोरोना संकटात राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अनेक विकासकामांसाठी निधी कमी पडत असल्याचा सूर सरकारकडून आळवला जात आहे. मात्र राज्याचा गाडा हाकणाऱ्यांना याचं सोयर-सुतक तरी आहे का? असा प्रश्नच आहे. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोशल मीडिया अकाउंट्स हाताळण्यासाठी तब्बल 6 कोटी रुपये एका वर्षासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी एका वेगळ्या एजन्सीकडे कंत्राट देण्यात येणार असल्याचं समजतं आहे. ही एजन्सी अजित पवार यांचं ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्स हाताळणार आहे. जवळपास 1200 कर्मचारी असलेलं जनसंपर्क खातं असताना आणि त्यावर वर्षाकाठी 150 कोटी खर्च होत असताना बाहेरच्या एजन्सीवर कोट्यवधींची उधळण कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘आपल्या मागं चुलता उभा हाय’ म्हणणाऱ्या अजित पवारांचं नेमकं चुकतंय तरी काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp