Maharashtra Cabinet: पावसाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल असं म्हटलं आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तसंच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अधिवेशनाच्या आधी विस्तार होईल असं म्हटलं आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)?
दिल्लीतल्या नेत्यांची आम्ही आज सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन काय आहे ते समजून घेण्यासाठी आम्ही दिल्लीत आलो आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसही होते. तसंच लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतला जाईल. रविवारी आषाढी एकादशी आहे. त्यानंतर अधिवेशनही घ्यायचं आहे. त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आमच्यावर जे काही आरोप केले जात आहेत, महाराष्ट्राचे तुकडे केले जाणार आहेत वगैरे त्यात काहीही तथ्य नाही. जे आरोप करत आहेत त्यांच्याकडे काहीही काम उरलेलं नाही त्यामुळे ते असे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. खोके पाठवले सांगत आहेत ते कसले खोके मिठाईचे होते का? असा प्रश्न विचारत पैसे वाटप झाल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. तसंच संजय राऊत यांना टोलाही लगावला