VIRAL VIDEO: IPS ने सांगितलं कशी होते हप्ता वसुली, आमिर खानची ‘ती’ क्लिप व्हायरल
मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचा काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘सत्यमेव जयते’ हा शो खूपच गाजला होता. याच शोमधील एक व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. साधारण 7 वर्षापूर्वीच टीव्हीवरील या शोमधील व्हीडिओ आता का व्हायरल होतो हे जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला अवघ्या काही दिवसांपूर्वीची पार्श्वभूमी असल्याचं जाणवेल. याचविषयी आता आम्ही […]
ADVERTISEMENT
मुंबई: बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याचा काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘सत्यमेव जयते’ हा शो खूपच गाजला होता. याच शोमधील एक व्हीडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. साधारण 7 वर्षापूर्वीच टीव्हीवरील या शोमधील व्हीडिओ आता का व्हायरल होतो हे जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला अवघ्या काही दिवसांपूर्वीची पार्श्वभूमी असल्याचं जाणवेल. याचविषयी आता आम्ही आपल्याला अगदी सविस्तरपणे सांगणार आहोत.
ADVERTISEMENT
जाणून घेऊयात व्हीडिओ व्हायरल होण्यामागची पार्श्वभूमी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 20 मार्चला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामुळे मोठा राजकीय भूकंप झाला होता. 100 कोटींच्या लेटरबॉम्बने ठाकरे सरकार हे चांगलंच हादरलं होतं. या पत्रामुळे सध्या महाराष्ट्रातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालं आहे.
हे वाचलं का?
परमबीर सिंग यांनी लिहलेल्या पत्रात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे गृहमंत्री अनिल देशमुख हे दर महिन्याला 100 कोटींची मागणी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यालाच जोडून आता मुंबई पोलीस कशाप्रकारे वसुली करतात याबाबतचा आयपीएस अधिकारी संजय पांडे यांचा सत्यमेवर जयतेमधील व्हीडिओ व्हायरल होतोय. (the fact that the ips sanjay pandey had spoken on aamir khans show on the recovery of police installments video is now going viral)
ठाकरे सरकारवर लेटरबॉम्ब ! अनिल देशमुखांनी वाझेंना दर महिन्याला १०० कोटी मागितले – परमबीर सिंग
ADVERTISEMENT
‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात IPS अधिकारी संजय पांडे नेमकं काय म्हणाले होते?
ADVERTISEMENT
सत्यमेव जयते कार्यक्रमात दरवेळेस नवनवे सामाजिक मुद्दे घेऊन त्याविषयी सविस्तरपणे चर्चा केली जायची. अशाच एका एपिसोडमध्ये आयपीएस अधिकारी संजय पांडे हे देखील हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांकडून घेतली जाणारी लाच याबाबत बोलत होते.
Someone asked… is Parambir Singh really revealing anything new?? He only put a specific number to it. Now ECONOMISTS should multiply that with some national data & stop claiming Indian business pays low taxes!! pic.twitter.com/pF5DSlHqbx
— Sucheta Dalal (@suchetadalal) March 22, 2021
आमिर खानचा प्रश्न: ‘आपल्याला नेहमी असं दृश्य दिसतं की, पोलीस किंवा कॉन्स्टेबल ते अनेकदा रस्त्यावर किंवा कोपऱ्यात जाऊन लाच घेततात. मग तो सामान्य माणूस असो किंवा ऑटो रिक्षा चालक… पोलीस कमी कमवतोय पण यामुळे त्याची कमाई मात्र चांगली असली पाहिजे.’
संजय पांडे यांचं उत्तर: ‘तो करत असलेली कमाई ही जर त्याच्यापुरती मर्यादीत असती तर ही गोष्ट मान्य करायला हरकत नाही. तो बिचारा सगळी कमाई आपल्या घरी घेऊन जात असेल असा मला विश्वास नाही. आपण सगळे लोकशाहीमध्ये राहत आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या वर कुणी तरी आहे. वरिष्ठ (Seniors) असतात. सीनयर्सचे देखील सीनयर्स असतात आणि त्यानंतर आपले राजकीय नेते आहेत. ही संपूर्ण साखळी आहे.
आमिर खानचा प्रश्न: हे लोकं दुकानदारांकडून देखील हप्ते घेतात. तर आपलं म्हणणं आहे की, हा पैसा इतर ठिकाणी देखील जातो?
संजय पांडे यांचं उत्तर: ‘ही गोष्ट मी आपल्याला समजावतो. सामान्य नागरिकाला समजेल अशा प्रकारचे दोन भष्ट्राचार असल्याचं मी मानतो. एक आहे असंघटीत प्रकार. म्हणजे… आपण रस्त्याने जात असताना आपल्याला विचारलं जातं की, आपलं लायसन्स कुठे आहे? आपण म्हणता की नाहीए काही अॅडजस्ट करुयात… तर अॅडजस्ट होतं. हा प्रकार असंघटीत आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही की, किती लोक पकडले जातील आणि किती लोक असे असतील जे आज 10 रुपये देतील, उद्या 50 रुपये देतील, परवा 25 रुपये देतील. तर हे असंघटीत आहे.’
देवेन भारतींच्या कामकाजावरही आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी उपस्थित केले प्रश्न
‘पण काही गोष्टी या खूप ठरवून म्हणजे संघटीतपणे आखून दिलेल्या आहेत. जसं की, आपल्याकडे रेस्टॉरंट आहेत, FL-3 लायसन्स आहेत. लिकर बार आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डान्स बार आहेत. ज्यावर बंदी देखील लावण्यात आली होती. कुठे-कुठे अजूनही चालू असतील. त्यामुळे हे संघटीत सेटलमेंट, इंस्टिट्यूशनल कलेक्शन आहे ते जरा वेगळं आहे. जास्तीत जास्त डिस्ट्रिब्यूशन जे होतं… बजेटरी एस्टिमेशन जवळ-जवळ सगळ्यांना माहित असतं. जसं आपल्याकडे एवढे रेस्टॉरंट आहेत. ही एक पूर्ण सिस्टम बनली आहे.’ असं संजय पांडे यांनी म्हटलं.
याचाच अर्थ मोठ्या संजय पांडे यांनी असं स्पष्ट केलं होतं की, पोलीस खात्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली केली जाते. आता परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर सत्यमेव जयते मधील हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर
कोण आहेत संजय पांडे?
सत्यमेव जयतेच्या व्हीडिओमध्ये पोलीस दलातील सत्य जगासमोर मांडणारे हे तेच संजय पांडे आहे ज्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. परमबीर सिंग यांच्या बदलीनंतर इतरही काही बदल्या करण्यात आल्या होत्या. ज्यानंतर आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी आपली नाराजी थेट पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली होती.
परमबीर सिंग यांच्याआधी संजय पांडे यांच्याकडे होमगार्ड विभागाच्या DG पदाचा पदभार होता. नवीन बदल्यांमध्ये पांडे यांना Maharashtra State Security Corporation विभागात हलवण्यात आलं. महत्वाच्या पदांसाठी आपला विचार केला जात नसल्यामुळे नाराज झालेल्या पांडे यांनी सुट्टीवर जाणं पसंत केलं. यावेळी संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्यावर अन्याय होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
‘महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम करत असताना माझी कारकिर्द ठप्प राहिलं याची जाणीवपूर्वक काळजी घेतली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यावर हा अन्याय होत आहे. परंतू नुकत्याच घडलेल्या घटनांनंतर या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण गरजेचं आहे. तुमच्या कारकिर्दीत माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्याची तुमच्याकडे संधी होती पण तुम्ही वारंवार या संधीकडे दुर्लक्ष केलं.’ असा आरोप संजय पांडे यांनी आपल्या पत्रात केला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT