किर्ती मोटे हत्याकांड : वडिलांनी किर्तीला घेऊन दिली होती बुलेट, ऑनर किलिंगचा आणखी एक ‘सैराट’ अँगल समोर

मुंबई तक

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले. या घटनेमुळे समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली म्हणून तिचे वडील नाराज झाले होते. किर्तीचे वडील तिच्या आईला शिव्या देत होते, मारहाण करत होते आणि तू तिच्याकडे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

इसरार चिश्ती, प्रतिनिधी, औरंगाबाद

किर्ती मोटे हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. किर्ती उर्फ किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन लग्न केले. या घटनेमुळे समाजात आपली प्रतिष्ठा धुळीला मिळाली म्हणून तिचे वडील नाराज झाले होते. किर्तीचे वडील तिच्या आईला शिव्या देत होते, मारहाण करत होते आणि तू तिच्याकडे लक्ष देऊ शकली नाहीस सांगत होते. त्यामुळे किर्तीला तिच्या आईने आणि भावाने ठार केले. आता या प्रकरणातला आणखी एक सैराट अँगल समोर आला आहे. किर्तीला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली होती.

किर्ती मोटेला तिच्या वडिलांनी बुलेट घेऊन दिली होती. या बुलेटवरच ती वैजापूर येथील महाविद्यालयात जात येत होती. किर्तीचं लग्न तिच्या वडिलांना धुमधडाक्यात करायचं होतं. पण तिने प्रेमविवाह केल्याने वडिलांच्या सगळ्या इच्छांना सुरुंग लागला. हाच राग मनात ठेवून ते आईला ते कोसत असत. त्यामुळेच तिच्या आईने आणि तिच्या भावाने तिला ठार केलं.

भावाने कोयत्याचे वार करत बहिणीचं शीर केलं धडावेगळं आणि ओरडला.. औरंगाबादच्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला

हे वाचलं का?

    follow whatsapp