Crime Diary: एकही गोळी न झाडता मुंबईवर 30 वर्ष राज्य करणारा पहिला डॉन
-रोहित हरिप Don Haji Mastan: मुंबई: अंडरवर्ल्ड (Underworld) म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते खून, खंडण्या आणि मारामाऱ्या, पण मुंबईमधला एक डॉन असा होता की त्याने त्यांच्या अख्ख्या आयुष्यात एकही मर्डर केला नाही, ना कोणाला स्वतःच्या हातांनी मारहाण केली. कोणावर एक गोळीसुद्धा झाडली नाही. पण जवळपास वीस वर्ष त्याने मुंबईच्या (Mumbai) अंडरवर्ल्डवर सलग राज्य केलं, […]
ADVERTISEMENT
-रोहित हरिप
ADVERTISEMENT
Don Haji Mastan: मुंबई: अंडरवर्ल्ड (Underworld) म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते खून, खंडण्या आणि मारामाऱ्या, पण मुंबईमधला एक डॉन असा होता की त्याने त्यांच्या अख्ख्या आयुष्यात एकही मर्डर केला नाही, ना कोणाला स्वतःच्या हातांनी मारहाण केली. कोणावर एक गोळीसुद्धा झाडली नाही. पण जवळपास वीस वर्ष त्याने मुंबईच्या (Mumbai) अंडरवर्ल्डवर सलग राज्य केलं, या वीस वर्षात एकही मर्डरचा गुन्हा त्याच्या विरोधात दाखल झाला नाही. या डॉनबद्दल एक गोष्ट अशीही सांगितले जाते ती म्हणजे एकदा त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हा या डॉनने थेट देशाच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींना निरोप पोहोचवला होता की मागाल तेवढे पैसे देतो पण सोडून द्या, इतका त्याचा दबदबा होता. (the first don to rule mumbai for 30 years without firing a shot crime diary haji mastan)
मुंबई पोलीस जेव्हा अंडरवर्ल्डबद्दल बोलतात तेव्हा ते एक गोष्ट कायम हटकून सांगतात ती म्हणजे मुंबईतला अंडरवर्ल्ड कधीही संपू शकत नाही. पण मुंबईत अंडरवर्ल्ड अस्तित्वात राहणार असेल तर ते या डॉनच्या काळात जसं होतं तसं असावं. कारण या डॉनच्या अंडरवर्ल्डने कधी सामान्य लोकांना त्रास दिला नाही त्यांचा रक्त कधी सांडलं नाही.
हे वाचलं का?
मुंबईतल्या कुठल्याही माणसाला विचारलं की मुंबईमधला पहिला डॉन कोण? तर एकच नाव समोर येतं ते म्हणजे हाजी मस्तान… (Haji Mastan)
अर्थात तेव्हा मुंबईमध्ये दोन अजून डॉन होते जे सक्रिय होते त्यांची नावे होती करीम लाला आणि दुसरा होता वरदाराजन मुदलियार. हे तिघंही एकाच काळात मुंबईत काम करत होते. वरदाराजन आणि करीम लाला हे पैसे कमवायचे ते दारू आणि जुगाराच्या धंद्यातून आणि हाजी मस्तानचा मुख्य धंदा होता तो smuggling चा.
ADVERTISEMENT
तमिळनाडूमधल्या आईकुलम गावात मस्तान हैदर मिर्झाचा जन्म झाला तारीख होती एक मार्च 1926.
ADVERTISEMENT
एक गरीब कुटुंबात हैदरचा जन्म झाला होता. घरात खायचे वांदे होते. दोन-दोन दिवस जेवायला मिळत नव्हतं. या गरिबीला कंटाळून मिर्झाच्या वडिलांनी ठरवलं की आपण मुंबईला जायचं.
मुंबईला आल्यावर मिर्झाच्या वडिलांनी सायकलचे दुकान टाकलं. या सायकलच्या दुकानात हैदर मिर्झा सायकल रिपेरिंगची कामं करायचा. कमाई होत नव्हती. बघता बघता दहा वर्ष निघून गेली. आठ वर्षांचा हैदर मिर्झा अठरा वर्षाचा झाला.
रूपेरी पडद्यावर तीन डॉन साकारणारा कलाकार कोण आहे माहित आहे का?
मुंबईतल्या मार्केटचा जो भाग आहे, तिथे रस्त्याच्या कडेला दुकान होतं. या सायकलच्या दुकानात बसल्यामुळे मस्तानच्या ओळखी वाढत होत्या. या एरियापासून जवळच मुंबईचे डॉकयार्ड होते.
या गोदीवर अनेक व्यवहार चालायचे, व्यापार चालायचा. या डॉकयार्डवरचे काही लोक सायकलच्या दुकानात यायचे. या मित्रांकडून मिर्झाला कळलं की गोदीवर काही गोष्टींची देवाण-घेवाण केली तर जास्त पैसा मिळतो.
दहा वर्षे सायकलच्या दुकानात घातल्यानंतर अर्थातच मिर्झाला अजून पैसे कमवायचे होते. त्याच्या महत्वकांक्षा जास्त होत्या त्यामुळे तो डॉकयार्डवर कामाला लागला. डॉकयार्डवर कामाला लागल्यानंतर मिर्झाची तिथल्या लोकांशी ओळख झाली. त्यातलाच एका माणसाने हेरलं की मिर्झा हुशार आहे. त्यांनी मिर्झाला डॉकयार्डवर चालणाऱ्या काही स्मगलिंगच्या व्यवहारांची माहिती दिली. त्याने मिर्झाला सांगितले की डॉकयार्डवर काही सामान येतं ते जर का तू तुझ्या कपड्यांमध्ये लपवून डॉकयार्डच्या बाहेर नेलं आणि कस्टमर अधिकाऱ्यांपासून चुकवलं तर चांगले पैसे मिळतील.
त्या काळात सोनं-इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टींची तस्करी चालायची, कारण की सोनं भारतात महाग होतं. त्यामुळे हळूहळू हाजी मस्तान हा स्मगलिंगच्या व्यवसायात उतरला. याशिवाय तिथून हजला जाणारे काही लोक आहेत. हजवरुन येताना हे लोकं परदेशातून काही सामान घेऊन यायचे. ते सामान डॉकयार्डच्या बाहेर पोहोचवण्याचं काम हाजी मस्तान करू लागला. त्यानंतर त्याला बऱ्यापैकी पैसा मिळायला लागला आणि हळूहळू तो स्मगलिंगच्या धंद्यात स्थिरावला.
याच काळात हाजी मस्तानची ओळख झाली ते एका अरबाशी… त्या अरबाचे नाव होतं शेख मोहम्मद अल गालिब.
शेख अल गालिबचा मुख्य धंदा असतो तो सौदी अरेबियातून सोनं आणण्याचा. तो एका खेपेला भरपूर सोनं घेऊन मुंबईला उतरतो. सोन्याचा एक मोठा वाटा तो हाजी मस्तानकडे सोपवतो. पण तेव्हाच डॉकयार्डवरच्या खबऱ्यांमार्फत कस्टमला ही बातमी कळते. कस्टमवाले छापा मारतात आणि शेख गालीबला पकडल्यानंतर त्याला तीन वर्षाची शिक्षा होते. शिक्षा भोगून शेख गालीब तुरुंगाच्या बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर तो हाजी मस्तानला भेटतो. हाजी मस्तान त्याला घेऊन घरी जातो. त्याच्या घरात असलेला बॉक्स शेख गालिबला दाखवतो आणि तो म्हणतो तुमचा बॉक्स आहे तुम्हीच तो उघडून बघा. शेख गालिबला खूप आश्चर्य वाटतं.
तीन वर्षानंतर त्याला तो बॉक्स मिळालेला असतो. शेख गालिब बॉक्स उघडतो. तो अख्खा बॉक्स हजारो सोन्याच्या बिस्किटांनी भरलेला असतो. शेख गालिब हाजी मस्तानवर खूप खुश होतो. तो हाजी मस्तानला अर्धी सोन्याची बिस्कीट देऊन टाकतो. इथून पुढं हाजी मस्तानचे आयुष्य बदलतं.
आता हाजी मस्तान मर्सिडीज घेतो, बंगला घेतो बॉलिवूडच्या स्टार्ससोबत ओळखी वाढवतो. अमिताभ बच्चन ते दिलीप कुमार सगळ्यांशी त्यांची जनपेहचान असते. या काळात हैदर मिर्झा हा कोट्याधीश माफिया झालेला असतो. स्वतःची एक वेगळी स्टाईल तो जपत असतो. नेहमी पांढरे शुभ्र कपडे, तोंडात सिगारेट अशी मस्तानची स्टाईल असते. याच काळात हैदर मिर्झाची लव्ह स्टोरी गाजयला लागते.
हैदर मिर्झा मधुबालाच्या प्रेमात पडलेला असतो. पण मधुबाला त्याला कधीच प्रतिसाद देत नाही. त्यामुळे हे प्रेम कायम एकतर्फीच राहते. हैदर मिर्झालादेखील त्याच्या मर्यादा माहिती असतात. तो मधुबालाच्या नाद सोडून देतो. मधुबालासारख्याच दिसणाऱ्या एका सोना नावाच्या अभिनेत्रीशी तो लग्न करतो. तिच्या सिनेमावर तो बराच पैसा खर्च करतो पण तिच्या फिल्म्स काही जास्त चालत नाहीत.
या दरम्यान हाजी मस्तानचा रुबाब वाढत चाललेला असतो. प्रतिष्ठा वाढत चाललेली असते. दुसरीकडे वरदराजन मुदलीयार चेन्नईला निघून जातो. करीम लाला सुद्धा त्याचा धंदा कमी करतो. मधल्या काळात मुंबईत अनेक टोळ्यांचा नव्याने उदय व्हायला सुरुवात झाली होती. पठाण गँग सुरू झाली होती. दाऊदचा उदय झाला होता. पण या सगळ्या गँग हाजी मस्तानच्या एका शब्दावर चालत होत्या.
जवळपास या 30 वर्षात हाजी मस्तानला एकदाही अटक झाली नाही. कारण हाजी मस्तान पोलीस अधिकाऱ्यांना कायम खुश ठेवत असतो. महागडी गिफ्ट देऊन अधिकाऱ्यांची तोंड बंद करण्यात हाजी मस्तनचा हातखंडा असतो. जे अधिकारी त्याला सहकार्य करत नसतात त्यांची हाजी मस्तान बदली करून टाकत असतो.
यानंतर देशात आणीबाणी लागते. इंदिरा गांधींनी हाजी मस्तानचे नाव ऐकलेले असते. त्याला अटक होते तुरुंगात टाकले जाते. इथूनच तो इंदिरा गांधींना निरोप पाठवतो की वाटेल तितके पैसे घ्या पण मला सोडा.
या जेलमध्ये हाजी मस्तानची ओळख जेपींशी होते. जेपींशी ओळख झाल्यावर मस्तान मिर्झाचे आयुष्य बदलून जाते. जेपीसुद्धा मस्तानला ओळखत असतात. तब्बल 18 महिने हाजी मस्तान हा तुरुंगात असतो. तुरुंगात जेपी मस्तानला बेकायदेशीर काम थांबण्याची शपथ देतात.
Exclusive : नवाब मलिक यांनी आरोप केलेली ‘लेडी डॉन’ या आरोपांवर काय म्हणते ऐका तिच्या शब्दात
18 महिन्यानंतर मस्तान मिर्झा तुरुंगाबाहेर येतो. नंतर इंदिरा गांधी यांचं सरकार पडतं.
1977 साली जनता पक्षाचा सरकार सत्तेत येतं तेव्हा देशातल्या 40 मोठ्या गुन्हेगारांना सोडून देण्यात येतं त्यात हाजी मस्तानचा पण समावेश असतो.
त्यांनतर 80 साली हैदर मिर्झा हजच्या यात्रेला जातो आणि तिथून हैदर मिर्झाला लोकं हाजी मस्तान म्हणून ओळखू लागतात. इथून पुढे हाजी मस्तान त्याच्या स्मगलिंगच्या धांद्यातून लक्ष काढून घ्यायला लागतो. 1984 मध्ये हाजी मस्तान राजकारणात प्रवेश करतो. जोगेंद्र कवाडे यांच्यासोबत ते दलित मुस्लिम यांची युती करून एका राजकीय पक्षाची निर्मिती केली जाते.
1990 मध्ये या पक्षाचा नाव भारतीय अल्पसंख्यांक महासंघ असा ठेवण्यात येतं. दिलीप कुमार यांचा या पक्षात महत्त्वाचं रोल होता. पण हा पक्ष फार काही चालत नाही. तोपर्यंत मुंबईमध्ये अरुण गवळी, दाऊद, छोटा राजन यांचा उदय झालेला असतो. दाऊद हा हाजी मस्तानचां उत्तराधिकारी होणार अशी चर्चा असते. जसा हाजी मस्तना राजकारणात जातो तसा त्याचा गँगवरचा त्याचा प्रभाव कमी होत जातो. पुढच्या काही काळात दाऊद हाजी मस्तानच्या गँगमधून बाहेर पडतो स्वत:ची वेगळी गँग स्थापन करतो.
हाजी मस्तानने ज्या-ज्या गोष्टींचा स्मगलिंग करण्याचे टाळले त्या सगळ्या गोष्टींचे स्मगलिंग दाऊदने करायला सुरुवात केली. ज्यामध्ये ड्रग्ज होते, हत्यारं होती, RDX होतं जे मुंबई बॉम्बस्फोटात वापरलं गेलं.
अंडरवर्ल्डचा चेहरामोहरा बदलून गेला. रस्तावर गँगवॉर सुरु झालं. बिल्डर लोकांना खंडण्या मागणं सुरु झालं. Ak 47 मुंबईच्या रस्त्यावर दिसू लागल्या. मुंबईकर यात भरडले जाऊ लागले.
1994 मध्ये हार्ट अटॅकने हाजी मस्तानचा मृत्यू होतो. मधल्या काळात करीम लाला आणि वरदाराजन मुदलियारचा देखील मृत्यू होतो. मुंबईवर राज्य करणारी एक पिढी संपून जाते.
आजही हाजी मस्तानच्या मुली मुंबईत राहतात. त्याला दोन मुली आहेत. तर एक मुलगा त्याने दत्तक घेतला होता.
हाजी मस्तानच्या मृत्यूनंतर त्यांची जागा दाऊद इब्राहिम, अरुण गवळी, छोटा राजन हे नवे माफिया घेतात. पण अंडरवर्ल्डचे हे बदलंत रुप खूप क्रूर आणि देशविघातक असतं.
त्यामध्ये हाजी मस्तान हा कायम लक्षात राहतो तो वेगळ्या अर्थाने आणि संदर्भाने. ज्याने कधीही कोणाचा खून केला नाही ना ज्याच्या अंगावर कोणती केस होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT