पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या पहिली ते चौथीच्या शाळा 15 डिसेंबरनंतर होणार सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

1 डिसेंबरपासून राज्यातल्या ग्रामीण भागातल्या पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. अशं असलं तरीही पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या पहिली ते चौथीच्या शाळा 15 डिसेंबरनंतर सुरू होणार आहेत.

ADVERTISEMENT

ओमीक्रॉन व्हेरीअंटचं संकट लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र आज पासून शाळा सुरू झाल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून शाळा 15 डिसेंबरनंतर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

आजपासून पुणे जिल्ह्यातल्या बहुतांशी शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 15 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दररोज शाळेत शंभर टक्के उपस्थित राहून शाळेचा परिसर निर्जंतुकीकरण करून तसेच वर्गखोल्या सॅनेटाईझ करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. याशिवाय शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून घेणे बंधनकारक आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी?

1 डिसेंबर म्हणजेच आजपासून शाळांमधले सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शाळा सुरू करण्याच्या पूर्वतयारीसाठी हजर राहतील

ADVERTISEMENT

शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने आणि कोव्हिड 19 आजाराच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीने बैठकीचे आयोजन करून पूर्वतयारी करावी.

ADVERTISEMENT

सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे १०० टक्के लसीकरण करून घ्यावे

कोव्हिड 19 संदर्भातल्या सगळ्या नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या उद्देशाने शाळा स्तरावर आवश्यक ते नियोजन करावं.

शाळा स्वच्छता, परिसर स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग या अनुशंगाने शाळेतल्या वर्गांच्या बाकांची व्यवस्था करणे. तसंच हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करणे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT