महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची पंक्चर रिक्षा, फक्त धूर निघतो -अमित शाह

मुंबई तक

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. त्या रिक्षेची तीन चाकं तीन दिशेला जाणारी आहेत असं मी मागे म्हटलं होतं. त्यात मी आज थोडासा बदल करतो, महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. या सरकारची चाकं तीन दिशेला आहेत. मात्र तिन्ही चाकं पंक्चर आहेत. ही रिक्षा पुढे जातच नाही फक्त धूर निघतो असं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. त्या रिक्षेची तीन चाकं तीन दिशेला जाणारी आहेत असं मी मागे म्हटलं होतं. त्यात मी आज थोडासा बदल करतो, महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. या सरकारची चाकं तीन दिशेला आहेत. मात्र तिन्ही चाकं पंक्चर आहेत. ही रिक्षा पुढे जातच नाही फक्त धूर निघतो असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.

महाराष्ट्र दौऱ्यात अमित शाह यांचा नाव न घेता पवारांना सल्ला

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट सांगितलं होतं की 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेने मात्र आमच्यासोबत विश्वासघात केला. सत्ता मिळवायची होती म्हणून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. मी आज पुन्हा सांगतो आहे की त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हेच ठरलं होतं. जे उद्धव ठाकरे मला खोटं ठरवतात त्यांनी एकदा प्रचार सभा काढून बघा. त्यात तुमचा फोटो केवढा होता बघा आणि बाकीचे फोटो बघा. मला खोटं ठरवण्याच्या आधी जरा आत्मपरीक्षण करून बघा.