मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रिक्षाचालक असतानाचा फोटो व्हायरल, काय आहे यामागचं सत्य?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जूनला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना नेतृत्वावर आक्षेप घेत त्यांनी बंड पुकारलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत आले ते आनंद दिघे यांच्यामुळे. आनंद दिघे यांना ते आपले राजकीय गुरू मानतात. शिवसेनेत येण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवत असत. सध्या सोशल मीडियावर एका रिक्षावाल्याचा फोटो व्हायरल होतो आहे. हा फोटो एकनाथ शिंदे जेव्हा रिक्षा चालवत असतानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र या फोटोमागचं सत्य काय ते आपण जाणून घेणार आहोत.

ADVERTISEMENT

व्हायरल फोटोत नेमकं काय आहे?

सध्या एकनाथ शिंदे यांचा एका फोटो रिक्षाचालक म्हणून व्हायरल होतो आहे. या फोटोत एक दाढीवाला रिक्षावाला एका रिक्षेजवळ उभा आहे. या रिक्षेचा नंबर MH 14 8172 असा आहे. या रिक्षेला हार घातला आहे. लायनिंगच्या शर्टमध्ये हा दाढीवाला रिक्षावाला उभा आहे. हा फोटो १९९७ मधला आहे असंही सांगितलं जातं आहे तसंच हा फोटो एकनाथ शिंदे यांचा आहे असं नेटकरी म्हणत आहेत.

व्हायरल फोटो खरंच एकनाथ शिंदे यांचा आहे का?

व्हायरल होणारा हा फोटो खरोखर एकनाथ शिंदे यांचा आहे का? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून बाबा कांबळे यांचा आहे. बाबा कांबळे हे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष आहेत. त्यांचा फोटो हा एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून तुफान व्हायरल झाला आहे. मात्र हा फोटो एकनाथ शिंदे यांचा नसून हा फोटो बाबा कांबळे यांचा आहे हे स्पष्ट झालं आहे. बाबा कांबळे हे पिंपरीच चिंचवडचे आहेत. त्यांनी आळंदी या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं धार्मिक शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या वडिलांनी सांगितल्यामुळे ते रिक्षा चालवतात.

हे वाचलं का?

अजित पवारांनी केला बाबा कांबळे यांना फोन

हा फोटो एकनाथ शिंदे यांचा आहे हे सांगणारा मेसेज छगन भुजबळ यांनी अजित पवारांना पाठवला. त्यावेळी अजित पवारांनी ही व्यक्ती कोण आहे हे जाणून घेतलं आणि त्यांना फोन लावला. अजित पवारांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांनी हा फोन लावला. त्यावेळी बाबा कांबळे यांनी हा फोटो माझाच असल्याचं अजित पवारांना सांगितलं. तसंच श्रावण महिन्यात आम्ही रिक्षांची पूजा करत असतो. १९९७ मध्ये अशीच पूजा आयोजित केली होती. त्यावेळी काढलेला हा फोटो आहे अशी माहिती बाबा कांबळे यांनी अजित पवारांना दिली.

अजित पवारांनी बाबा कांबळे यांना चांगलं काम करा असा सल्ला दिला आहे. त्यांनी फोन केल्याबद्दल बाबा कांबळे यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. तसंच छगन भुजबळांनी आपल्याला हा फोटो पाठवला नेमका कुणाचा फोटो आहे हे कळत नव्हतं म्हणून तुम्हाला फोन केला असंही अजित पवार यांनी बाबा कांबळे यांना सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT