सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत, शरद पवारांचा मोदींना टोला
पुण्यात झालेल्या महाराष्ट्र कनेक्ट कॉनक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी या तिघांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी ईडी कारवाया, महाविकास आघाडीचा प्रयोग यासह विविध विषयांवर आपली मतं मांडली. सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत असं म्हणत […]
ADVERTISEMENT

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र कनेक्ट कॉनक्लेव्ह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मुलाखत घेण्यात आली. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी या तिघांची मुलाखत घेतली. यावेळी शरद पवारांनी ईडी कारवाया, महाविकास आघाडीचा प्रयोग यासह विविध विषयांवर आपली मतं मांडली. सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत नाहीत असं म्हणत त्यांनी मोदींनाही टोला लगावला आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार?
“सध्याचे राज्यकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत असे राज्यकर्ते नाहीत, त्यांना असं वाटतं की ईडीच्या धाडी टाकल्या, विरोधकांवर आरोप केले की अशा पद्धतीने विचाराशी संघर्ष करणारा जो घटक आहे तो तातडीने शरणागती पत्करेल. ईडीची नोटीस निवडणुकीच्या आधी मलाही आली होती. मी त्यानंतर सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला सकाळी ईडीच्या कार्यालयात जायचं आहे. मी ईडीच्या कार्यालयात येतो असं सांगत त्यांना फोनही केला. तर ईडीचे अधिकारी हात जोडत आले आणि येऊ नका म्हणाले. त्यामुळे अशी संकटं आल्यानंतर आपलं नाणं खणखणीत असल्याने दडपशाहीला घाबरायचं नाही.”
या सगळ्या प्रवृत्तींना धाडसाने तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. या लोकांनी कधी आयुष्यात संघर्षाला खऱ्या तोंड देण्याची भूमिका घ्यावी लागते. एवढंच नाही जाणीवपूर्वक नव्या पिढीत धर्मवादाचा प्रसार करण्याचं काम काही लोक करतात. माझं स्वच्छ मत आहे की त्यांना यश येणार नाही. लोक ऐकतील आणि दुर्लक्ष करतील आणि हा विषय सोडून देतील असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.