ठरलं! ‘या’ तारखेला रिलिज होणार गंगुबाई काठियावाडी
प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा कधी रिलिज होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र आता सिनेमाच्या रिलिजची तारीख आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर केव्हाच आला आहे. मात्र रिलिज डेट आली नव्हती. हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र तो झाला नाही. कोरोनामुळे […]
ADVERTISEMENT
प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा कधी रिलिज होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र आता सिनेमाच्या रिलिजची तारीख आली आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर केव्हाच आला आहे. मात्र रिलिज डेट आली नव्हती. हा सिनेमा 6 जानेवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र तो झाला नाही. कोरोनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे.
गंगुबाई काठियावाडी ही भूमिका सिनेमात आलिया भटने साकारली आहे. तर अजय देवगण या सिनेमात करीमलाला या मुंबईच्या पहिल्या डॉनची भूमिका साकरतो आहे. 60 च्या दशकात मुंबईतील महिला माफिया असलेली गंगुबाई हिच्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
काय आहे गंगुबाईचा इतिहास?
मुंबईतील कामाठीपुरा परिसर म्हणजेच रेड लाईट एरिया. प्रत्येक मुंबईकर या भागातून जाताना जरा दबकूनच जातो. जशी जशी वर्ष सरत गेली कामाठीपुऱ्यातील परिस्थिती ही बदलत गेली. मात्र देहविक्री करणाऱ्या महिलांच्या मनात आजही एक नाव कायम आहे. ते म्हणजे गंगूबाई काठियावाडी.. कामाठीपुऱ्यातील प्रत्येक घरात आजही गंगूबाईचा फोटो आहे आणि या भागात गंगुबाईचा पुतळा आहे ज्याला आजही तितक्याच श्रध्देने पुजलं जातं. कारण गंगुबाई काठियावाडी एकप्रकारे कामाठीपुऱ्याची राणीच होती.
ADVERTISEMENT
गंगूबाई काठियावाडी हा सिनेमा हुसेन जैदी यांच्या “माफिया क्वीन्स ऑफ मुंबई” या पुस्तकावर आधारित आहे. यातील माहितीनुसार गंगूबाईचं खरं नाव गंगा हरजीवनदास. गुजरातमधील काठियावाडीत तिचा जन्म झाल्याने कालांतराने तिचं नाव गंगूबाई काठियावाडी असं झालं. गंगूबाईला लहानपणापासूनच सिनेमाचं वेड होतं.मुंबईत जायचं आणि अभिनेत्री व्हायचं हे एकच स्वप्न उराशी तिने बाळगलं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. तिच्या वडिलांकडे काम करणाऱ्या अकाऊंटट रमणिकलाल सोबत तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. तिला अभिनेत्री व्हायचं होतं पण वडिलांचा विरोध असल्याने तिने आधी रमणिकलाल सोबत लग्न केलं आणि मुंबईला आली. मात्र रमणिकलालने मुंबईत आल्यावर आपले खरे रंग दाखवले. केवळ ५०० रूपयांच्या आमिषाने रमणिकलालने गंगूबाईला कुंटणखान्यात विकले. ज्यानंतर गंगुबाई जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ओढली गेली.
ADVERTISEMENT
गंगुबाईचा पुढचा प्रवास तर अजून नरकयातना सहन करण्याचा होता. मुंबईत त्याकाळात पठाण गँगची चांगलीच दहशत होती. करीम लाला हा या सर्व पठाणांचा कैवारी होता. मुंबईत करीम लालाची चांगलीच दहशत होती तितकाच त्याला मानही होता. या गँगमधील काही पठाण कामाठीपुऱ्यात यायचे.. यातील एका पठाणाने गंगूबाईसोबत प्रचंड शारिरीक अत्याचार केले. अत्याचाराची परिसीमा गाठूनही हा पठाण काही शांत बसेना. गंगूबाई प्रचंड त्रास सहन करत होती. खूपवेळा तर ती आजाराही पडली.तरीही तो पठाण तिच्यावर तसेच अत्याचार करत राहिला.
वेश्या असल्याने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणाला सांगणार असाही प्रश्न गंगुबाईसमोर होता. त्याचवेळी तिला करीमलाला विषयी माहिती मिळाली. इतर महिलांप्रमाणे गंगुबाई अन्याय सहन करणारी नव्हती. तिने या पठाणाचा निकाल लावायचा पण केला. तसं करीम लालाला गाठणं सामान्य माणसाच्या बस की बात नव्हती. पण गंगूबाईने हिंमत करून करीमलालाकडे गेली. आपली फिर्याद त्याच्याकडे मांडली. आपल्यावर अन्याय करणारा पठाण तुमच्याच गँगचा आहे त्याला अद्दल घडवा मी तुमची आयुष्यभर सेवा करीन असं गंगुबाईने करीमलाला याला सांगितलं. करीमलालाने गंगुबाईला बहीण मानलं आणि तिच्यावर अन्याय करणाऱ्या पठाणालाही चांगलीच अद्दल घडवली. या कथेवर सिनेमा बेतलेला आहे.
ADVERTISEMENT