अंबानींच्या घराबाहेर सापडलेली Scorpio मी वापरलेली नाही-सचिन वाझे
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ATS ने सचिन वाझेंचा जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात सचिन वाझे यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली मनसुख हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ वापरली असल्याचं नाकारलं आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी असं सांगितलं होतं की ज्या स्कॉर्पिओ मध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आणि जी स्कॉर्पिओ अँटेलिया बाहेर आढळली ती सचिन […]
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ATS ने सचिन वाझेंचा जबाब नोंदवला आहे. आपल्या जबाबात सचिन वाझे यांनी अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली मनसुख हिरेन यांच्या मालकीची स्कॉर्पिओ वापरली असल्याचं नाकारलं आहे. मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी असं सांगितलं होतं की ज्या स्कॉर्पिओ मध्ये जिलेटिनच्या कांड्या आढळल्या आणि जी स्कॉर्पिओ अँटेलिया बाहेर आढळली ती सचिन वाझे यांच्याकडे नोव्हेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत होती. ५ फेब्रुवारी सचिन वाझेंनी स्टेअरिंग जाम असल्याचं कारण देत ही स्कॉर्पिओ परत केली होती.
Sachin Vaze नी माझ्या पतीची हत्या केल्याचा संशय-विमला हिरेन
मनसुख हिरेन यांना मृत्यूच्या एक दिवस आधी भेटलो असल्याचंही सचिन वाझे यांनी त्यांच्या जबाबात नाकारलं आहे. मनसुख हिरेन हे अडचणीत सापडल्याचं लक्षात येताच हिरेन कुटुंबीयांनी तुम्हाला संपर्क करण्याचं का ठरवलं असं विचारलं असता हिरेन कुटुंबीयांचा माझ्यावर विश्वास होता म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला असं उत्तर सचिन वाझे यांनी दिलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मनसुख हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार त्यांची स्कॉर्पिओ मुलुंड विक्रोळी लिंक रोडवर बंद पडली होती. त्यानंतर त्यांनी कॅब करून मुंबई गाठली. दुसऱ्या दिवशी ते आपली गाडी पाहण्यासाठी गेले तेव्हा ती गाडी तिथे नव्हती. तसंच मनसुख यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार मनसुख यांना मृत्यूच्या एक दिवस आधी रात्री एक फोन आला होता त्यामुळे ते संबंधित पोलीस अधिकाऱ्याला घोडबंदर येथे भेटायला जातो आहे असं सांगून घराबाहेर पडले होते. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरण हे विधानसभेत गेल्या चार दिवसांपासून गाजतं आहे. या प्रकरणी मंगळवारी देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.
विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. तर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओचं प्रकरण NIA कडे आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडे देण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने त्यांच्या जबाबात त्यांचे पती मनसुख यांची हत्या झाल्याचा दावा करत ही हत्या सचिन वाझेंनी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी आज एटीएसने सचिन वाझे यांची चौकशी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT