राजीनाम्याचा प्रश्नच नाही, गृहमंत्री चांगलं काम करतायत- जयंत पाटील
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केली. यानंतर गेल्याकाही दिवसांपासून मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना राज्य सरकारकडून मिळणारा पाठींबा या दोन मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली […]
ADVERTISEMENT

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी अटक केली. यानंतर गेल्याकाही दिवसांपासून मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझेंना राज्य सरकारकडून मिळणारा पाठींबा या दोन मुद्द्यांवरुन विरोधकांनी राज्य सरकारला चांगलंच घेरलं होतं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी अनिल देशमुख यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला जाईल अशा बातम्या फिरत होत्या. परंतू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
16 वर्ष निलंबन.. तरीही सचिन वाझे का आणि कसे परतलेले मुंबई पोलिसात?
“मंत्रिमंडळा फेरबदल होणार ही बातमी चुकीची आहे. गृहमंत्रीपदावरुन अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. ते चांगलं काम करत आहेत. शरद पवारांनी आजची बैठक ही मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बोलावली होती. त्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक झाली ज्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.” जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांना माहिती दिली. दरम्यान, सचिन वाझेंच्या अटकेनंतर विरोधी पक्षातील भाजपने शिवसेनेला चांगलंच कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे.
सचिन वाझेंनी IPL बुकींकडून १५० कोटींची खंडणी मागितली – नितेश राणे