नागपूरच्या चोरांची अजब कहाणी, थंडीपासून बचाव करण्यासाठी चोरलेली बाईक जाळली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. उप-राजधानी नागपूरमध्ये पारा चांगलाच घसरला आहे. थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अनेकजण स्वेटर, मफलर, कानटोपी, जॅकेट अशा विविध गोष्टींचा वापर करतात. अनेक ग्रामीण भागात उब घेण्यासाठी शेकोटीही केली जाते. परंतू नागपूरमध्ये थंडीपासून बचाव करण्यासाठी एक वेगळा आणि धक्कादायक मार्ग चोरांच्या टोळीने स्विकारला आहे.

दरोडेखोरांच्या एका टोळीने थंडीपासून स्वतःचं रक्षण व्हावं यासाठी स्वतः चोरलेली दुचाकी जाळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय.

हे वाचलं का?

पुणे: विमानाने पुण्यात यायचे अन् चोरी करायचे, श्रीमंत चोरटे कसे सापडले पोलिसांच्या जाळ्यात?

नागपूरच्या छोटा सर्फराज टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना छोटा सर्फराजची टोळी आपल्या हद्दीत दरोडा टाकणार असल्याची माहिती समजली. यानंतर त्यांनी सापळा रचून या टोळीला जेरबंदही केलं. यानंतर झालेल्या चौकशीत सर्फराजने शहरातून विविध ठिकाणी १० दुचाकी चोरल्याचं कबुल केलं.

ADVERTISEMENT

या दुचाकी कुठे आहेत याबद्दल विचारलं असता सर्फराज आणि त्याच्या साथीदारांकडून पोलीस ९ दुचाकी हस्तगत करु शकले. दहाव्या दुचाकीबद्दल विचारलं असता आपण ती दुचाकी थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शेकोटी म्हणून पेटवल्याचं या टोळीने कबुल केलं. पोलिसांपासून लपण्यासाठी ही टोळी एका शेतात रात्री थांबली होती.

ADVERTISEMENT

नागपूर : पार्किंगमधली कार बाहेर काढताना चालकाचं नियंत्रण सुटलं, अपघातात तरुण गंभीर जखमी

या दरम्यान रात्री जोरदार थंडी पडल्यामुळे शेकोटी करण्यासाठी या टोळीला लाकडं किंवा कचरा मिळाला नाही. अखेरीस या टोळीने बाईक पेटवून स्वतःचं थंडीपासून संरक्षण केलं. टोळीच्या या कृत्यामुळे पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. नागपुरात सध्या थंडीमुळे पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.

इन्स्टाग्रामवरील ‘302 शंभर टक्के’ स्टेटसमुळे गेला जीव; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT