ही वेळ आणीबाणीची, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा: राज ठाकरे
मुंबई: राज्यात मागील चार दिवसापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी तर पूर्णपणे हतबल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळेच ही वेळ आणीबाणीची असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात मागील चार दिवसापासून बरसणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. विशेषत: मराठवाड्यातील शेतकरी तर पूर्णपणे हतबल झाला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळेच ही वेळ आणीबाणीची असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील बऱ्याच भागात पाऊस सातत्याने बरसत आहे. गुलाब चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष फटका हा महाराष्ट्राला बसला आहे. अनेक भागाता शेती पिकांसह जमीन खरवडून गेलीय. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरीव मदतीची आवश्यकता आहे. अशी मागणी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. यासाठी त्यांनी सरकारला एक पत्रक देखील लिहलं आहे.
पाहा राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकात काय म्हटलंय:
‘महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसानं कहर केला आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक तर गेलंच आहे, परंतु घरा-दाराचं नुकसानही फार झालं आहे. ही वेळ आणीबाणीची आहे.’