Bheed : कोरोना, भूक अन् असहायतेची भयंकर कहाणी; ट्रेलर पाहिलात का?

मुंबई तक

मुंबई : लॉकडाऊन… या एका शब्दाचं नाव जरी कानावर पडलं तरी अंगावर काटा उभा राहतो. या काळात अनेकांच्या डोक्यावरील छप्पर गेलं. अनेक जणांच्या हातचं काम सुटलं. शहरच्या शहर ओसाड पडली. सर्वसामान्य लोकांना दोनवेळेच्या अन्नाची भ्रांत पडली होती. मजूर काम करणारे अनेक परराज्यातील नागरीक रस्त्याने पायी घराकडे परताना दिसले. दरम्यान, लॉकडाउन काळातील हे भयाण वास्तव आता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई : लॉकडाऊन… या एका शब्दाचं नाव जरी कानावर पडलं तरी अंगावर काटा उभा राहतो. या काळात अनेकांच्या डोक्यावरील छप्पर गेलं. अनेक जणांच्या हातचं काम सुटलं. शहरच्या शहर ओसाड पडली. सर्वसामान्य लोकांना दोनवेळेच्या अन्नाची भ्रांत पडली होती. मजूर काम करणारे अनेक परराज्यातील नागरीक रस्त्याने पायी घराकडे परताना दिसले. दरम्यान, लॉकडाउन काळातील हे भयाण वास्तव आता ‘भीड’ (‘Bheed’) या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. (‘Bheed’, the story of the same helpless people is seen in these pictures.)

‘आर्टिकल १५’, ‘अनेक’, ‘मुल्क’, ‘थप्पड’ अशा वेगळ्या धाटणीचे, कधी सामाजिक आशयावर तर कधी रोखठोक वास्तवावर आशय-विषयाची मांडणी असलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक ‘अनुभव सिन्हा’ यांनी ‘भीड’चे दिग्दर्शन केले आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपट येत्या २४ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लॉकडाउनच्या घोषणा अंगावर काटा आणते आणि त्यानंतर हळूहळू या कथेची दाहकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचते.

भीडमध्ये एका पत्रकाराची भूमिका साकारत असलेल्या कृतिका कामरा यांचा एक संवाद आहे- ‘मला भारताची फाळणी झाल्यासारखी वाटते’. एके दिवशी अचानक या लोकांना कळले की ते जिथे राहत होते तिथे त्यांची घरे नाहीत. या संवादातून अनुभव सिन्हा यांची ‘भीड’ची कथा सांगण्याची दृष्टी दिसते.

Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड

हे वाचलं का?

    follow whatsapp