कलाबेन डेलकर शिवसेनेच्या नाहीत म्हणणाऱ्यांचा जळफळाट! संजय राऊतांचं नारायण राणेंना उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत. त्यांनी धनुष्य-बाण चिन्हावर निवडणूक लढवली नाही. एक खासदार निवडून आल्यानंतर दिल्लीला धडक देण्याच्या गोष्टी संजय राऊत यांनी करू नयेत असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्याबाबत आता संजय राऊत खास शैलीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवनिर्वाचित खासदार कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या नाहीत म्हणणाऱ्यांचा जळफळाट दिसतो आहे. जरा निवडणूक आयोगाची वेबसाईट बघा शिवसेना जिंदाबाद असं ट्विट करत संजय राऊत यांनी नारायण राणेंना उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर कलाबेन डेलकर यांच्या नावापुढे पक्षाचं नाव शिवसेना असं लिहिलेलं दिसतं आहे. सबसे अलग हूँ.. पर गलत नहीं. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते नारायण राणे?

ADVERTISEMENT

संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. ते काय लिहितात, काय बोलतात ते त्यांचं त्यांना कळतं की नाही माहित नाही. रात्री लिहिण्याच्या गोष्टी सकाळी लिहित असल्यामुळे असं होत असेल असंही नारायण राणे म्हणाले.

अरे एकने आम्हाला काय फरक पडतो? त्या संजय राऊतला कळतं तरी काय.. हे पराभव झाला म्हणून आम्ही भाव कमी केले.. काय संबंध आहे? काही बोलायचं. अरे आम्ही काय अल्पमतात आलोय का तिकडे? 303 आहेत. पुढे आहे म्हणा.. तुमचं अजून स्वत:चं धनुष्यबाण नाही तिथे पोहचलंय. तिथे बॅट पोहचली आहे. आम्ही यांना गृहीतही धरत नाही.’

‘एकाने जर पंतप्रधान होणार असतील तर पाहायला नको होतं. मग एवढे मतदान का घ्यावे लागले असते. संजय राऊत एकतर काही तरी सरकला. मला तर वाटतंय सरकरलाय. एका माणसामुळे सत्ता बदलणार?’

‘अरे यांना महापालिका चालवता येत नाही. बेस्ट चालवता येत नाही. तर सरकार काय चालवणार. त्यामुळे हे महाराष्ट्राचा खेळखंडोबा करणार. एक जिंकला तर म्हणे महाराष्ट्र जिंकला. शिवसेनेचं नाव घ्या ना. महाराष्ट्रावर कशाला ढकलता.’ अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT