सायरस मिस्त्रींसोबत गाडीत होते एकाच कुटुंबातील तिघे; गाडी चालवणाऱ्या त्या प्रसिद्ध डॉक्टर कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्रींचा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह त्यांचे मित्र जहांगीर पंडोले यांना देखील अपघातात आपला जीव गमवावा लागला. दोघे गाडीत पाठीमागच्या सीटवर बसले होते. तर गाडी डॉक्टर अनाहिता पंडोले चालवत होत्या व त्यांचे पती डॅरियस हे बाजूच्या सीटवर बसले होते. दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. जहांगीर हे डॅरियस पंडोले यांचे लहान भाऊ होते.

ADVERTISEMENT

मिस्त्री आणि पांडोले कुटुंबियांचे संबंध

डॅरियस पंडोले यांचं मिस्त्री कुटुंबांशी अतिशय जवळचं नातं आहे. सायरस मिस्त्री यांचे ते बालमित्र आहेत. कॅथड्रॉल जॉन कॅनॉन स्कुलमध्ये दोघे एकत्र शिकले. डॅरियस पंडोले हे ड्राइव्हर सीटच्या बाजूच्या सीटवर बसले होते. गाडी त्यांच्या पत्नी अनाहिता चालवत होत्या.अपघातात दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर वापी येथील रेनबो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आज त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात एअरलिफ्ट करून आणलं जाणार आहे. त्यांचे घरगुती संबंध असलेले प्रसिद्ध सर्जन डॉक्टर मेहली नजीर त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार आहेत, अशी बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे.

हे वाचलं का?

जहांगीर पंडोले

पंडोले कुटुंब स्क्वॅश आणि इतर खेळांसाठीही प्रसिद्ध आहे. जहांगीर हे एक व्यावसायिक स्क्वॅश खेळाडू होते आणि 1991 मध्ये आशियाई ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली होती. लंडन स्थित केपीएमजी कार्यलयात ते ग्लोबल स्टेटर्जी ग्रुपचे डायरेक्टर होते. सायरस मिस्त्री यांच्यासोबत ते पाठीमागच्या सीटवर बसले होते. अपघातात मिस्त्रींसह त्यांचा देखील मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

डॅरियस पंडोले

ADVERTISEMENT

डॅरियस पंडोले हे जे.एम फायनांशल प्रायव्हेट इक्यूटी या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचा सॉफ्ट ड्रिंकचा व्यवसाय देखील होता. ड्यूक अँड सन्स लिमिटेडचं देखील काम पाहतात. डॅरियस यांनी यापूर्वी टाटा ग्लोबल बेव्हरेजेसच्या संचालक मंडळावर गैर-कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे. मिस्त्री यांना टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर लगेचच डिसेंबर 2016 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. पांडोले यांनी मिस्त्रींच्या हकालपट्टीच्या ठरावाच्या विरोधात मतदान केले होते.

अनाहिता पंडोले

अनाहिता या मुंबईतील प्रसिद्ध गायनॉकलॉजिस्ट आहेत. ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्या सेवा देतात. अनाहिता पांडोळे दीर्घकाळापासून ब्रीच कँडी हॉस्पिटलशी संबंधित आहेत. त्यांना 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्या मुंबईतील अनेक हाय-प्रोफाइल लोकांच्या कुटुंबातील महिलांचं बाळंतपण म्हणजे डिलेव्हरी त्यांनी केलेली आहे. त्यांनी सामाजिक प्रश्नावर नेहमी आवाज उठवला आहे. मुंबईत लागणाऱ्या होर्डिंगच्या विरोधात देखील त्यांनी मोहीम उघडली होती. गेल्या आठवड्यातच त्यांनी बीएमसीला पत्र लिहून वेस्टर्न एक्सप्रेस हाय्व्हेलगत असणाऱ्या फुटपाथवर लागणाऱ्या होर्डिंग्जचा विरोध केला होता. पारशी समाजातील लोकसंख्येतील घट रोखण्यासाठी राबविलेल्या जिओ पारसी या उपक्रमाच्या संस्थापकांपैकी त्या एक आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT