Tauktae Cyclone: बार्ज P305 जहाजावरील तब्बल 22 जणांचे मृतदेह हाती, अद्यापही 53 जणांचा शोध सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) 17 मे रोजी मुंबईजवळील (Mumbai)अरबी समुद्रात (Arabian Sea) थैमान घातलं होतं. याच वादळात (Cyclone) बार्ज P305 (Barge P305) हे भलं मोठं जहाज अडकलं होतं. ज्यामध्ये तब्बल 273 क्रू मेंबर आणि कामगार काम करत होते. यापैकी 184 जणांची भारतीय नौदलाने मोठ्या कठीण परिस्थितीतून सुटका केली. पण दुर्दैवाची बाब म्हणजे तौकताई चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या या जहाजावरील 22 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

आतापर्यंत नौदलाच्या हाती 22 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर अद्यापही 53 जण बेपत्ता असून सध्या नौदलाकडून त्यांचा शोध सुरु आहे. नौदलाच्या वेगवेगळ्या तुकड्या या शोध मोहिमांसाठी कार्यरत आहेत.

आपल्या बचावकार्यादरम्यान, नौदलाने सांगितलं की, एक मोठी नौका (Barge P305)ही वादळादरम्यान, भर मध्य समुद्रात अडकली होती. ज्यामध्ये 273 जण होते. त्यातील 184 जणांना वाचविण्यात आलं आहे.’ (Total of 22 Dead bodies recovered so far by Indian Navy after sinking of barge P305 during Cyclone Tauktae)

हे वाचलं का?

Taukte वादळाच्या तडाख्यात समुद्रात अडकलेल्या 77 जणांचा शोध सुरू, 184 जणांना नौदलाने वाचवलं

नौदलाला आतापर्यंत एकूण 34 मृतदेह सापडले

ADVERTISEMENT

मुंबईतील खोल समुद्रात जेव्हा चक्रीवादळ पोहचलं त्यावेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या जहाजांवर अनेक लोक अडकले असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून भारतीय नौदलाने बचाव मोहीम हाती घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, तीन जहाजांवर एकूण 695 लोक अडकले होते. ज्यापैकी 619 जणांना वाचविण्यात यश आलं असून 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित लोकांचा अद्यापही शोध सुरुच आहे.

ADVERTISEMENT

AFCONS या ONGC साठी काम करणाऱ्या कंपनीने जारी केलं पत्रक

AFCONS या ओएनजीसीसाठी काम करणाऱ्या कंपनीने एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आमची कंपनी गेल्या पाच दशकांहून अधिक काळ काम करते आहे. गेल्या पाच दशकातलं हे सर्वात मोठं चक्रीवादळ आम्ही पाहिलं आहे या चक्रीवादळात Pappa 305 अर्थात P 305 ही बार्ज बुडून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. चार्टर्ड बार्ज P 305 M/s Durmast Enterprises Limited यांचं होतं तेथील क्रू मेंबर आणि खलाशीही याच कंपनीचे होते. सोमवारी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आणि समुद्र खवळला तेव्हा P 305 मध्ये 261 जण होते.

Maharashtra Cyclone impact : 18 जणांचा मृत्यू आणि 28 जण जखमी

या सगळ्यांनी बार्ज बुडण्यापूर्वी लाईफ जॅकेट आणि इतर सुरक्षासंबंधी उपकरणं घालून समुद्रात उड्या मारल्या. भारतीय तटरक्षक दल आणि नौदल यांनी P 305 मधील 182 जणांची सुखरूप सुटका केली आहे. जे कर्मचारी बेपत्ता आहेत त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी नौदल आणि भारतीय तटरक्षक दल झटतं आहे. बाधित झालेल्या इतर बार्जवरचे कर्मचारी सुखरूप आहेत. जे कर्मचारी समुद्रात बेपत्ता झाले आहेत त्यांची सुटका करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती कठीण आहे.. मात्र आमच्या सद्भवना आणि प्रार्थना या त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT