मुंबई-पुणे महामार्गावर ट्रेलर-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मंगळवारी रात्री मुंबई-पुणे महामार्गावर ट्रेलर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. केमिकलचे ड्रम भरुन घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे दोन्ही वाहनं काही क्षणांमध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटाच्या सुरुवातीला हा अपघात घडला.

ADVERTISEMENT

घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व इतर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे सर्व प्रयत्न हे व्यर्थ ठरत होते. केमिकलमुळे ही आग अजुन भडकत होती आणि त्यामुळे परिसरात धुराचं साम्राज्य निर्माण झालं होतं. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवली.

दरम्यान या अपघातात दोन जणं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळपर्यंत ही आग पूर्णपणे विझली नसली तरीही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूकडची वाहतूक हळुहळु सुरु केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT