Bhaskar Jadhav: उद्धव ठाकरे गंभीर आजारी असताना गद्दारांनी संधी साधली, त्यानंतर हेच लोक भाजपसोबत गेले
उद्धव ठाकरे हे जेव्हा आजारी पडले होते तेव्हा त्यांची काळजी घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांनी घ्यायला हवी होती त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर हेच गद्दार लोक भाजप सोबत गेले. उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रिया या जिवावरच्या धोक्याच्या होत्या. उद्धव ठाकरेंना तेव्हा हा विश्वास द्यायला हवा होता की आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र त्याचवेळी गद्दारांनी संधी साधली. ही बाब महाराष्ट्राच्या […]
ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे हे जेव्हा आजारी पडले होते तेव्हा त्यांची काळजी घेऊन महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांनी घ्यायला हवी होती त्यांनी गद्दारी केली. त्यानंतर हेच गद्दार लोक भाजप सोबत गेले. उद्धव ठाकरेंवर झालेल्या शस्त्रक्रिया या जिवावरच्या धोक्याच्या होत्या. उद्धव ठाकरेंना तेव्हा हा विश्वास द्यायला हवा होता की आम्ही तुमच्यासोबत आहोत. मात्र त्याचवेळी गद्दारांनी संधी साधली. ही बाब महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांवर टीका केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना
१९ जून १९६६ ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणारे दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, मनोहर जोशी यांच्यासारखे अनेक नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्यापर्यंत पोहचवत होते. शिवसेनेकडे तेव्हा सत्तेचं साधन नव्हतं तेव्हा फक्त विचार होते. मात्र आज आपल्यासोबत विचार तर आहेच पण विकासही आपल्यासोबत आहे. असा विकास आपल्याप्रमाणे इतर कुठलाही पक्ष करू शकला नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांनाही टोला
आम्हाला सत्ता हवी, आम्हाला खुर्ची हवी ते लोकांची जनतेची सेवा करण्यासाठी. एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री महाराष्ट्रात आले आणि त्यांनी काय सांगितलं? गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला मुंबईची सत्ता हवी असं त्यांनी सांगितलं. ही मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी आपल्या लोकांनी जे हौताम्य पत्करलं होतं. ही मुंबई आपल्याला त्यांनी मिळवून दिली. त्याच मुंबईवर फार फार वर्षांपासून काही लोकांचा डोळा आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी अमित शाह आणि भाजपला टोला लगावला.
आपल्याला जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता हवी आहे. मात्र एक पक्ष जो मुंबई मागतो आहे तो त्यांच्या स्वार्थासाठी मागतो आहे. आज गटप्रमुखांना निर्धार करायचा आहे की आपल्याला शिवसेनेचाच भगवाच मुंबई महापालिकेवर फडकावायचा. परवा गणपतीचं विसर्जन झालं त्यावेळी गणरायाचं विसर्जन करताना भक्तिभाव होता. मात्र गणरायाचं विसर्जन सुसह्य झालं ते शिवसेनेमुळे हे कुणी विसरू नये असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.