नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण

मुंबई तक

नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूला आता नवं वळण मिळालंय. पोलिसांनी केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार दुबे यांच्याकडे 3 मोबाईल नंबर होते. ज्यातील केवळ 2 नंबरबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती होती. 1 फेब्रुवारीला दुबेंचा चुलत भाऊ चंदन कुमार याच्याशी तिसऱ्या नंबरवरून संपर्क झाला होता. त्यानंतर हा तिसरा नंबर वापरत असलेला फोन बंद करण्यात आला. पालघर पोलिसांनी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूला आता नवं वळण मिळालंय. पोलिसांनी केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार दुबे यांच्याकडे 3 मोबाईल नंबर होते. ज्यातील केवळ 2 नंबरबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती होती. 1 फेब्रुवारीला दुबेंचा चुलत भाऊ चंदन कुमार याच्याशी तिसऱ्या नंबरवरून संपर्क झाला होता. त्यानंतर हा तिसरा नंबर वापरत असलेला फोन बंद करण्यात आला.

पालघर पोलिसांनी नौदल अधिकारी सुरजकुमार दुबेंच्या बँक खात्यांचाही तपास केला. यामध्ये दुबेंनी भोपाळमधील आस्था आणि मुंबईतील एंजल या शेअर ब्रोकिंग कंपनीसोबतही याच नंबरवरून काही व्यवहार केल्याचं समोर आलंय. दुबेंचं सॅलरी अकाऊंट मुंबईतल्या कोलाब्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. या खात्यावरून दुबेंनी 8 लाखांचं कर्ज काढलेलं. या खात्यात आता केवळ 302 रूपये उरलेत.

याशिवाय दुबेंचं एसबीआयमध्येच आणखी एक अकाउंट होतं. ज्यामध्ये 5 हजार रूपये होते, पण ते ही 1 फेब्रुवारीला चेन्नईतून काढण्यात आलेले. या दोन्ही अकाऊंटवरून अनेक कर्ज काढण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

सुरजकुमार यांनी आपल्या नौदलातील एका सहकाऱ्याकडूनही 6 लाख घेतले होते, ज्याची परतफेड करण्याबाबत तो सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरजकुमार यांना सांगत होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp