देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वॉर.. जाणून घ्या कारण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने समिती गठीत केली. या समितीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टिकास्त्र सोडलं. ज्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं. मग फडणवीसांनी आणखी एक उत्तर दिलं.. त्या उत्तरावरही प्रत्युत्तर देण्यात आलं. सोशल मीडियावर या दोन नेत्यांमधलं ट्विटर वॉर चांगलंच रंगलं.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

न्यायालयीन आयोगाचे अधिकार या समितीला नाहीत. त्यामुळे ही समिती म्हणजे निव्वळ धूळफेक आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांचं गांभीर्य या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर या समितीला काही अर्थ उरत नाही. तसंच हा प्रश्न उरतोच की उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विद्यमान गृहमंत्र्यांच्याविरोधात चौकशी कशी करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. टीका करत असताना फडणवीस यांनी झोटिंग समितीचाही दाखला दिला होता. खडसेंची चौकशी करताना आम्ही झोटिंग समिती स्थापन केल्याची बाब देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

परवानगीशिवाय रश्मी शुक्लांनी फोन टॅप केले, नंतर मुख्यमंत्र्यांसमोर रडल्या – जितेंद्र आव्हाड

देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा ही टीका केली तेव्हा उत्तर देताना जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीसांना उद्देशून एक ट्विट केलं. ज्यात झोटिंग समितीला कमिशन ऑफ इनक्वायरी अॅक्ट अन्वये चौकशी करा असे एखादे तरी आपल्या शासनाचे पत्र दाखवावे असं म्हटलं होतं. ज्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

ADVERTISEMENT

एवढंच नाही तर आव्हाड यांनी ट्विट केलं आणि तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर जमीन व्यवहारासंबधी लावण्यात आलेली न्यायमूर्ती बी. एस. झोटींग कमिटी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपासंबधी लावण्यात आलेली के. यु. चांदीवाल कमिटी यांच्या परिपत्रकामध्ये एक शब्दाचेही अंतर नाही असंही फडणवीसांना उद्देशून लिहिलं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राचं गृहखातं कोण चालवतं? अनिल देशमुख की अनिल परब?-फडणवीस

फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्रच ट्विट केलं आणि ट्विटमध्ये म्हणाले की माझे परममित्र जितेंद्र आव्हाडजी मुख्य सचिवांचा अहवाल कुणी लिहिला? हे काही आपण सांगत नव्हतो. वाट पाहत होतोच आणि अपेक्षित परिणामही साधला गेला. असो हा घ्या तो आपल्याला हवा असलेला कागद.. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समितीच्या अहवालाचं पत्रच त्यांना उत्तरादाखल पाठवलं.

पुन्हा जितेंद्र आव्हाडाचं ट्विट

जितेंद्र आव्हाड यांनी हेच देवेंद्र फडणवीस यांच पत्र पुन्हा ट्विट करत त्यावर एका ओळीचं उत्तर लिहिलं ‘हे पत्र आपणच पाच महिन्यांनी काढलं, आत्ता घाई का करता आहात?’ आव्हाड यांच्या या ट्विटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काही ट्विट केलेलं नाही. मात्र या दोघांमध्ये झालेल्या ट्विटर वॉरची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT