PM Modi Twitter Hack : मोदींचं अकाऊंट हॅक करताना Internal System चा वापर नाही – सूत्रांची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर अकाऊंट मध्यरात्री दोन वाजल्याच्या दरम्यान हॅक करण्यात आलं. हॅकरने मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन बिटकॉईनला अधिकृत मान्यता देत असल्याचं ट्विट केलं. पंतप्रधान कार्यालयाला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ ट्विटरच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत मोदींचं अकाऊंट पूर्ववत केलं. या प्रकारानंतर ट्विटरने या प्रकरणात चौकशीला सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

प्राथमिक चौकशीत मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यासाठी ट्विटरच्या Internal System चा वापर झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी India Today ला दिली.

PM Narendra Modi यांचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनबद्दल केली होती घोषणा

हे वाचलं का?

“ट्विटरने आतापर्यंत केलेल्या अंतर्गत चौकशीच्या माध्यमातून हे समोर आलं आहे की पंतप्रधान मोदींचं अकाऊंट हॅक करताना ट्विटरच्या इंटर्नल सिस्टीमचा वापर झालेला नाही.” मागच्या वर्षात हॅकर्सची जगभरातील प्रमुख नेत्यांची ट्विटर अकाऊंट हॅक केली होती. याच पॅटर्नच्या माध्यमातून मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा ट्विटरला संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरु राहणार आहे.

‘Modi सर्वांचं ऐकतात हीच त्यांची खरी ताकद, कँडल मार्च-ट्विट करुन BJP चा पराभव अशक्य’!

ADVERTISEMENT

ट्विटरच्या हेल्पलाईनचे अधिकारी हे २४ तास पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कात असतात. ज्या क्षणी आम्हाला पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं कळलं, त्यावेळी आम्ही तात्काळ उपाययोजना करत हे अकाऊंट पूर्ववत केलं आहे. आतापर्यंतच्या चौकशीच हॅकरने मोदींच्या अकाऊंटव्यतिरीक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या अकाऊंटला आपलं लक्ष्य केलेलं नसल्याचं कळतंय अशी माहिती ट्विटर इंडियाच्या प्रवक्त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना दिली.

ADVERTISEMENT

मध्यरात्री दोन वाजल्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सीबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. बिटकॉईनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचं मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगण्यात आलं. कालांतराने हे अकाऊंट पूर्ववत झालं असलं तरीही या प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT