खळबळजनक! दोन मित्रांची एकाच खोलीत आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Two bestfriend Together Suicide : सातारा जिल्ह्यातील (Satara) दोन जिगरी दोस्तांनी (Two bestfriend) एकाच खोलीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन्ही तरूणांचा मृत्यू झाला आहे. एका तरूणाने गळफास घेतला तर एकाने स्वत:ला पेटवून घेत आयुष्य संपवलं होते. घरातून आगीचे लोट येताना पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या घटनेत दोन्ही तरूणांनी नेमकी का आत्महत्या केली आहे? याचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते.या घटनेचा तपास पोलीस करतायत. (two best fried suicide in room satara district koregaon shocking incident police investigation this case)

ADVERTISEMENT

सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरेगाव शहरात एकाच खोलीत दोन मित्रांनी (Two bestfriend) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेच एका तरूणाने स्वत: ला गळफास लावून घेतला, तर एकाने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केली. या आत्महत्येच्या घटनेने सातारा हादरलं आहे.

बातम्या वाचता वाचता महिला अँकर जमिनीवर कोसळली, थरकाप उडवणारा Video व्हायरल

हे वाचलं का?

या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव येथील अनन्या रेसिडेन्सीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या दोन मित्रांनी राहत्या घरी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे. या घटनेत एकाने स्वत:ला गळफास लावून आयुष्याचा शेवट केला, तर दुसऱ्याने स्वत:ला पेटवून घेत आयुष्य संपवलं. दरम्यान या घटनेत घरातून आगीचे लोट बाहेर येताना पाहून ही घटना उघडकीस आली. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली आहे. या भयंकर घटनेने कोरेगावसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अनैतिक संबंधांचा संशय…आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीला जिवंत जाळलं

ADVERTISEMENT

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी खुप तपास केला मात्र त्यांना आत्महत्येची चिठ्ठी सापडली नाही. तसेच आत्महत्ये संदर्भातलं ठोस कारणही सापडलं नाही आहे. पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या नागरीकांशी चौकशी देखील केली आहे. मात्र त्यातून काय माहिती मिळाली आहे, ही अद्याप कळू शकले नाही आहे.

ADVERTISEMENT

अवघ्या 500 रूपयांसाठी शेजाऱ्यानेच घेतला जीव, संपूर्ण गावं हादरलं!

तरूणांवर आर्थिक संकट होते की परिक्षेत नापास झाले होते, अशा सर्व दिशेने पोलीस तपास करतायत. त्यामुळे दोन मित्राच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे. दरम्यान, या तरुणांनी आत्महत्या का केली असावी याबद्दलचे कारण अद्याप समोर आले नाही. दोन तरुणांनी एकाचवेळी एकाच रुममध्ये आत्महत्या करणे संशयास्पद असल्याने याबाबत सखोल तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. या घटनेचा कोरेगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. आता या दोन मित्रांच्या आत्महत्येचा छडा लावण्यात पोलिसांना (Police) यश येते की नाही, हे पाहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT