राष्ट्रवादीचे दोन बडे नेते भाजपच्या वाटेवर? दिल्लीत फडणवीसांची घेतली भेट, अजित पवार म्हणाले…
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) राष्ट्रवादीचे दोन बडे नेत्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे तसेच मोहोळ मतदार संघावर वर्चस्व असलेले आणि परमनंट आमदार म्हणून ओळख असलेले राजन […]
ADVERTISEMENT
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) राष्ट्रवादीचे दोन बडे नेत्यांनी दिल्ली येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून सोबत असलेले माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे तसेच मोहोळ मतदार संघावर वर्चस्व असलेले आणि परमनंट आमदार म्हणून ओळख असलेले राजन पाटील यांनी दिल्ली येथे भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.
ADVERTISEMENT
राजन पाटील, बबवनराव शिंदे भाजपच्या वाटेवर?
माढा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीने ही भेट घडली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही दिग्गज नेते भाजपत जाणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र कारखान्याच्या प्रश्नांबाबत ही भेट असल्याचे स्पष्टीकरण माजी आमदार राजन पाटील यांनी दिलंय नो कमेंट असं उत्तर माढयाचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिलंय. या प्रश्नावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सर्व भेटी कामानिमित्त असल्याचे म्हणत सर्व चर्चानं तूर्तास तरी ब्रेक लावला आहे. मात्र या भेटीची खुमासदार चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांच्या समवेत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. आणखीन एक वेळ राजन पाटील यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक होणार आहे असा खुलासा त्यांनी दोन दिवसापूर्वीच केला होता, असं असताना देखील अचानक भाजप नेत्याची राजन पाटील यांनी भेट घेतल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हे वाचलं का?
भाजप प्रवेश बाबत आमदार बबनदादा शिंदे यांना विचारले असता नो कमेंट म्हणून त्यांनी पत्रकारांना उत्तर देणे टाळले आहे तर खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी वेट अँड वॉच असं सूचक वक्तव्य केले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT