डोंबिवली : रिक्षा उभी करण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
रिक्षा उभी करण्याच्या वादातून डोंबिवलीत दोन भावांना एका कुटुंबाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत सर्वेश दीक्षित हा तरुण जखमी झाला असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. डोंबिवली पश्चिमेत राहणारे सर्वेश आणि हर्ष दीक्षित हे दोन भाऊ भुवन इमारतीत राहतात. दोन्ही भाऊ […]
ADVERTISEMENT

रिक्षा उभी करण्याच्या वादातून डोंबिवलीत दोन भावांना एका कुटुंबाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत सर्वेश दीक्षित हा तरुण जखमी झाला असून विष्णूनगर पोलीस ठाण्यात याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत.
डोंबिवली पश्चिमेत राहणारे सर्वेश आणि हर्ष दीक्षित हे दोन भाऊ भुवन इमारतीत राहतात. दोन्ही भाऊ इमारतीच्या खाली उभे असताना सोनू उपाध्याय नावाचा व्यक्ती आपली रिक्षा घेऊन त्याठिकाणी आला आणि त्याने हर्षला तुमची रिक्षा इथे लावालची नाही असं म्हणत शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली.
या प्रकाराबद्दल कळताच सर्वेशने आपल्या भावाला झालेल्या मारहाणीबद्दल जाब विचारला असता सोनूने त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या मारहाणीत सोनू उपाध्यायची पत्नी आणि परिवारही सहभागी झाला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. सोनूच्या पत्नीने बांबूने केलेल्या मारहाणीत सर्वेशला जखम झाली आहे.
या प्रकरणी रिक्षा चालक सोनू उपाध्यय व त्याच्या पत्नी विरोधात विष्णुनगर पोलीस स्थानकात 323, 324, 504 आणि 34 कलमानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.