फडणवीसांच्या नागपुरात दुहेरी हत्याकांड! व्यापाऱ्यांना गोळ्या घातल्या, जाळलं अन्…

योगेश पांडे

ADVERTISEMENT

Two businessmen were murdered in Nagpur. Police have arrested five people in this case.
Two businessmen were murdered in Nagpur. Police have arrested five people in this case.
social share
google news

Nagpur Crime News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरमध्ये थरकाप उडवणारे हत्याकांड घडले आहे. दोन व्यापाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना जाळण्यात आलं आणि अर्धवट जळालेले मृतदेह वर्धा नदीत फेकण्यात आले. नागपूरमध्ये हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. (Two businessmen were killed in Nagpur. Nagpur police have arrested five people.)

या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, दोन्ही व्यापाऱ्यांची हत्या करण्याचं कारणही समोर आलं आहे.

वाचा >> Pune Crime News : महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार! सावकाराचं भयंकर कृत्य

निराला कुमार सिंग आणि अंबरीश गोळे अशी मृत व्यावसायिकांची नावे आहेत. निराला कुमार यांचा ऑनलाइन व्यापार असून अंबरीश गोळे हे बांधकाम व्यावसायिक होते. दोघांची हत्या का करण्यात आली, याबद्दल पोलिसांनी माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दोन व्यापाऱ्याची हत्या का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि निराला कुमार सिंह व अंबरीश गोळे या दोन उद्योजकांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. आरोपींनी या दोन्ही उद्योजकांचे अपहरण केले आणि त्यांना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी परिसरात असलेल्या एका फार्म हाऊसवर नेले.

वाचा >> Pune Crime : पत्नी-पुतण्याला का घातल्या गोळ्या? कारण येणार समोर, पोलिसांना तपासाचा मार्ग सापडला

आरोपींनी दोन्ही व्यापाऱ्यांना तिथे नेल्यानंतर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. व्यापाऱ्यांची हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकले. हे मृतदेह अर्धवट जळल्यानंतर ते वर्धा नदीच्या पात्रात फेकण्यात आले.

ADVERTISEMENT

हत्या केल्याचे कसे झाले उघड?

नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबरीश गोळे हे बेपत्ता असल्याची तक्रार नागपूरमधील सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दुसरीकडे निराला कुमार सिंग हे बेपत्ता असल्याची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती.

ADVERTISEMENT

वाचा >> Crime: नवऱ्याला खुंटीला बांधलं अन् बायकोवर तिघांकडून गँगरेप

व्यापाऱ्यांची हत्या कुणी केली?

बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली. भारवाडी नजीक वर्धा नदीच्या परिसरात एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला, तर दुसरा मृतदेह खडगा गावाजवळ आढळला. पेट्रोल टाकून जळलेले मृतदेह पाण्यात फेकलेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींची नावे ओंकार तलमले, हर्ष आनंदीलाल वर्मा, दानेश शिवपेठ, लकी तुर्केल, हर्ष बागडे अशी आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT