एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी वाढल्या; पुण्यात आणखी दोन गुन्ह्यांची नोंद
आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीविरुद्ध पुण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गोसावीविरोधात पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. नोकरी लावून देतो असे सांगून पुण्यातील एका तरुणांची किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केली होती. किरण गोसावी आर्यन खान […]
ADVERTISEMENT

आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावीच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नोकरीचं आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या किरण गोसावीविरुद्ध पुण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे गोसावीविरोधात पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत.
नोकरी लावून देतो असे सांगून पुण्यातील एका तरुणांची किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केली होती. किरण गोसावी आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता, 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
दरम्यान, किरण गोसावीची पोलीस कोठडीत रवानगी झाल्यानंतर पुण्यातील लष्कर आणि वानवडी पोलीस ठाण्यामध्ये आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे किरण गोसावी विरोधात पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहे. गुन्ह्यांची संख्या वाढल्याने किरण गोसावीचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
किरण गोसावी फसवणुकी प्रकरणी फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी माहिती दिली. पुण्यातील कसबा पेठ परिसरात राहणाऱ्या चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी लावून देतो, असं गोसवीने सांगितलं होतं. त्यासाठी त्याने वेळोवेळी असे मिळून तीन लाख रुपये घेतले होते. त्या दरम्यान तो तरुण मलेशियात गेला, पण तिथे गेल्यावर त्याला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.