शाहरूख खानच्या ‘मन्नत’ बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत घुसले दोन तरूण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shah Rukh Khans Bunglow Mannat : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan) सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना घडली आहे. दोन तरूण शाहरूखच्या मन्नत बंगल्याची (Mannat Bunglow) सुरक्षा भेदून आत शिरले होते. विशेष बाब म्हणजे हे तरूण सुरक्षा भेदून तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. त्यावेळेस बंगल्याची सिक्युरीटी गार्डची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही तरूणांना आता पोलिसांच्या हवाली केले आहे.पोलीस या दोन्ही तरूणांचा कसून तपास करत आहेत. (two men arrested to illegaly entering shah rukh khan mannat bunglow to meet him)

ADVERTISEMENT

Gauri Khan : शाहरूखच्या पत्नीविरोधात पोलिसात तक्रार, काय आहे प्रकरण?

कोण आहेत तरूण?

पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी त्याची कसून चौकशी केली होती. या चौकशीत तरूणांनी सांगितले की ते गुजरातचे रहिवासी आहेत आणि ते शाहरूखला (Shah Rukh khan) भेटण्यासाठी गुजरातवरून आले होते. या दोन्ही तरूणाचे 20 ते 25 वर्षे आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता परवानगी विना शाहरूखच्या (Mannat Bunglow) बंगल्यात घुसल्याप्रकरणी आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा आता पुढील तपास करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

Sushmita Sen: प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनला आलेला हृदयविकाराचा झटका

गौरी खानच्या अडचणी वाढल्या

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (Shahrukh Khan Wife) याची पत्नी आणि डिझायनर गौरी खान (Gauri Khan) हिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गौरीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 409 (विश्वास भंग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका प्रॉपर्टीवरून तिच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरीशिवाय तुलसियानी कन्स्ट्रक्शन अॅंड डेव्हलपमेंट लिमिटेडचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि संचालक महेश तुलसियानी ( Mahesh Tulsiyani)यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील रहिवासी जसवंत शहा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर गौरी खानच्या अडचणी वाढल्या आहेत.

ADVERTISEMENT

दरम्यान शाहरूख खानच्या (Shah Rukh khan) सध्या पठाण (Pathaan) चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहे. या सिनेमाच्या भरघोस यशानंतर शाहरूख खान पुन्हा नव्या सिनेमाच्या शुटींगकडे वळला आहे. शाहरूख खान जवान चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. चाहत्यांना त्याच्या या सिनेमाची उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT