ईडीच्या चौकशीला सामोरं जायला माझ्यात दम आहे, तुमच्यात आहे का?; उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माण तालुक्यातील एका कार्यक्रमात खासदार उदयन राजेंवर खंडणीखोर म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली होती याला खासदार उदयनराजे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तुम्ही त्या काळी साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली..? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता… या कंपन्या साताऱ्यातून जाण्याला कारणीभूत कोण […]
ADVERTISEMENT
सातारा: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माण तालुक्यातील एका कार्यक्रमात खासदार उदयन राजेंवर खंडणीखोर म्हणत अप्रत्यक्षपणे टीका केली होती याला खासदार उदयनराजे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. तुम्ही त्या काळी साताऱ्याचे लोकप्रतिनिधी होता, मंत्री होता त्यावेळी तुमची जबाबदारी का नाही पार पाडली..? ज्या कंपन्या साताऱ्यातून गेल्या त्यांना जाऊन विचारा मला कशाला विचारता… या कंपन्या साताऱ्यातून जाण्याला कारणीभूत कोण आहे..? असे असताना मलाच खंडणी मागतात असा उलट आरोप केला जात आहे.
ADVERTISEMENT
मी पक्षाला घरचा आहेर दिला असे बोलले जाते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावे. माझ्यात दम आहे मी ईडीची चौकशी सामोरे जायला तयार आहे. तुमच्यात दम असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा. तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहेत हे ठरवावे अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता उदयन राजेंनी केली आहे.
माझ्या गाडीचे टायरच दोन लाखांचे आहेत अशा दोन-दोन लाखांच्या खंडणी मी कशासाठी मागेन? माझी प्राॅपर्टी सुद्धा प्रचंड आहे. वेळ पडली तर भिक मागेन पण खंडणी मागण्याचं काम करणार नाही, असं सडेतोड उत्तर अजित पवार यांना उदयनराजेंनी दिलंय तसंच कोणाच्यात दम असेल त्यांनी माझ्या समोर येवुन बोलावं असं आव्हान सुद्धा उदयनराजे यांनी अजित पवारांना देत सगळ्यांचीच एकदा ईडी चौकशी होवुन जावुद्यात तेव्हाच खरं काय ते समोर येईल असं ही उदयनराजे म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी माण, खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यात एमआयडीसीमध्ये उद्योग का आले नाहीत याचे कारण सांगताना अप्रत्यक्षपणे उदयनराजेंना टोला लगावला होता. त्याला आज उदयनराजेंन त्यांच्या स्टाईलने त्याला उत्तर दिले आहे.दरम्यान उदयन राजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीच्या तिकीटावर उदयन राजे लोकसभेवरती खासदार होते परंतु त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि यात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील विजयी झाले. आता राजे भाजपकडून राज्यसभेवर खासदार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT