राज्यपालांविरोधात ‘आक्रोश’; निघण्यापूर्वी शिवरायांना अभिवादन, उदयनराजे रायगडावरून देणार इशारा
छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजे आज (2 डिसेंबर) रायगडावर जाऊन भूमिका मांडणार आहेत. उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, […]
ADVERTISEMENT
छत्रपती शिवाजी महाराजांना जुन्या काळातील आदर्श म्हणणाऱ्या भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्यासाठी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झालेत. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र पाठवल्यानंतर कोणतीही कार्यवाही न झाल्यानं उदयनराजे आज (2 डिसेंबर) रायगडावर जाऊन भूमिका मांडणार आहेत.
ADVERTISEMENT
उदयनराजे भोसले यांनी गेल्या आठवड्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्याची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्यानं छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन रायगडावर जाणार असल्याची घोषणा केली होती.
उदयनराजे भोसले आज किल्ले रायगडाच्या दिशेने रवाना झाले. ‘निर्धार शिवसन्मानाचा’ या माध्यमातून उदयनराजे भोसले भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबद्दलची नाराजी सरकारपर्यंत पोहोचवणार आहे. 2 डिसेंबर रोजी उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून रायगडाच्या दिशेने प्रयाण केलं.
हे वाचलं का?
‘शिवरायांचं नाव घेतलं की, मुस्लिम मतं…’, राज ठाकरेंची कोणावर जहरी टीका?
निर्धार शिवसन्मानाचा : उदयनराजे भोसले यांचा रायगड दौरा
उदयनराजे भोसले सकाळी 8 वाजता महाड येथून पाचाडकडे निघणार आहेत. त्यानंतर 8.45 वाजता पाचाडला पोहोचणार आहेत. 9 वाजता उदयनराजे भोसले रोप वे ने किल्ले रायगडावरील समाधीस्थळाकडे जाणार आहेत. 9.10 वाजता रायगडावर पोहोचल्यानंतर शिरकाई देवीचे दर्शन, होळीचा माळ येथील शिवस्मारकास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी अभिवादन करणार आहेत. राजसदरेवरून भूमिका मांडणार आहेत. त्यानंतर जेवण करून परत फिरणार आहेत.
ADVERTISEMENT
Udayanraje Bhosale : महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांविरोधात राष्ट्रद्रोहाचं कलम लावा
ADVERTISEMENT
भगतसिंह कोश्यारींचं वादग्रस्त वक्तव्य : उदयनराजे भोसले काय बोलणार?
उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवण्याची भूमिका घेतलेली आहे. छत्रपती संभाजीराजेंनीही हीच भूमिका घेतलेली आहे. भगतसिंह कोश्यारी यांना हटवण्यासाठी उदयनराजे भोसले आक्रमक झालेले असून, रायगडावर ते काय भूमिका मांडणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे कान लागलेले आहेत.
किल्ले रायगड कडे मार्गस्थ असताना वाई येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. pic.twitter.com/2iqJhUEx8t
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) December 2, 2022
उदयनराजे भोसले भाजपचे राज्यसभेतील खासदार आहेत. भाजपचे खासदार असून, भाजपच्या केंद्रातील सरकारकडून त्यांच्या मागणीची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार की, राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देणार की आणखी कुठली भूमिका घेणार हे महत्त्वाचं असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तिथे उदयनराजे पंतप्रधानांची भेट घेणार का? याबद्दल उदयनराजे भोसले काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT