Uddhav Thackeray: भर उन्हात.. ठाकरेंनी घातला कार्यकर्त्यांच्या काळजालाच हात, भाषण जसंच्या तसं!
Uddhav Thackeray criticized pm modi along with CM Shinde: मुंबई: मुंबईतील (Mumbai) ‘मातोश्री’ या (Matoshri) निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (18 फेब्रुवारी) थेट रस्त्यावर येऊन प्रचंड गर्दीत कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं असं भाषण केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली आहे. पाहा […]
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray criticized pm modi along with CM Shinde: मुंबई: मुंबईतील (Mumbai) ‘मातोश्री’ या (Matoshri) निवासस्थानाबाहेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज (18 फेब्रुवारी) थेट रस्त्यावर येऊन प्रचंड गर्दीत कार्यकर्त्यांच्या काळजाला हात घालणारं असं भाषण केलं आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह (CM Eknath Shinde) पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार टीका केली आहे. पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. (uddhav thackeray made a speech outside matoshree strongly criticized pm modi along with shinde)
लोकांच्या गराड्यात, गाडीमध्ये उभं राहून उद्धव ठाकरेंचं भाषण…
‘आज महाशिवरात्र आहे आणि उद्या शिवजयंती आहे. या दिवसांचं मुहूर्त बघून शिवसेना हे नाव, धनुष्यबाण चोरलंय. पण ज्यांनी चोरलंय त्यांना हे माहित नाही की, त्यांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय. आजपर्यंत त्यांनी मधमाशांनी जमवलेल्या मधाचा आस्वाद त्यांनी घेतलाय. पण मधमाशांचा डंख आता मारायची वेळ आली आहे.’
‘मला कल्पना आहे की, तुम्ही सगळेजण चिडलेले आहात. असा कोणताही पक्ष नसेल की, ज्यांच्यावर गेल्या 75 वर्षात असा आघात केला असेल. पण भाजप आणि पंतप्रधानांना असं वाटत असेल की, त्यांच्या हाताशी ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्या गुलाम बनलेल्या त्या अंगावर सोडून कदाचित इतर पक्ष संपवता येतील पण शिवसेना संपवता येणं शक्य नाही.’
‘माझं आव्हान आहे… निवडणूक आयुक्तांनी जी काल गुलामी केली आहे.. गुलामीच मी म्हणतो. कदाचित ते निवृत्त झाल्यानंतर कुठले तरी राज्यपाल होऊ शकतील. सांगता येत नाही. कारण आताच एक न्यायमूर्ती राज्यपाल झाले आहेत. हे असे गुलाम त्यांनी अवतीभवती ठेवले आहेत. त्या गुलामांना मी आव्हान देतोय. शिवसेना कोणाची. हे तुम्ही तुमच्या मालकाच्या आदेशाने ठरवू शकणार नाही.’
‘कोणालाही विचारा शिवसेना कोणाची.. यांचा जो डाव चालला आहे.. यांना ठाकरे नाव पाहिजे बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण शिवसेनेचं कुटुंब नकोय. आपल्यावर जेव्हा आरोप केले जात होते की, तुम्ही मोदींचं नाव घेऊन मतं मिळविली तेव्हा आमची युती होती. एक जमाना जरूर होता की, जनता मोदींचे मुखवटे घालून सभेला येत होते. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून महाराष्ट्रासमोर यावं लागतंय. ही आपल्या शिवसेनेची ताकद आहे.’
Devendra Fadnavis: पक्षामध्ये, पक्षाबाहेर लोकं एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात: फडणवीस