Uddhav Thackeray: माफ केलं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंकडून कोंडी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray press Conference : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धुळवडीच्या कार्यक्रमात एक विधान केलं. ते म्हणाले, “आम्ही सर्वांना माफ केलं.” फडणवीसांच्या याच विधानावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उलट सवाल करत फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. (Uddhav Thackeray Reaction On Devendra fadnavis statement)

कसबा पेठचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला.

माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मी पहिल्यांदा विधिमंडळात जाणार आहे. काही विषय असेल, तर सभागृहात जाईन. ज्यावेळी मला आवश्यक वाटेल, त्यावेळी सभागृहात जाईन. कुठे बोलण्याची गरज असेल, तर जरूर बोलेन.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी मुंबई Tak ने उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला की, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की आम्ही विरोधकांना माफ केलं.”

त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “यावर मी काय बोलू. जे त्यांच्यासोबत गेले नाहीत. राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, अनिल परब यांच्यावर ज्या धाडी आणि चौकशा सुरू आहेत. माजी नगरसेवकांवर सुरू आहे. त्या गोष्टी नेमक्या कसल्या आहेत?”, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

‘कशाला राजकीय बोलायला लावता?’, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत चढला पारा

ADVERTISEMENT

पुढे ठाकरे असंही म्हणाले की, “त्या बदल्यात येत नाही का? सुडामध्ये येत नाही? सूडभावनेनं पेटून तुम्ही सत्तेचा दुरूपयोग करता आहात. मी परवाच्या सभेत सांगितलं की, कुटुंबच्या कुटुंब टीका करून आरोपांची राळ उडवून बदनाम करायची, उद्ध्वस्त करायची, तरीदेखील ती उद्ध्वस्त नाही झाली, तर लाळघोटेपणाने परत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं.”

ठाकरेंची मोदी-शाहांवर टीका, म्हणाले, ‘लाचारपणाने…’

“मेघायलयात हेच दिसलं. कोनराड संगमांच्या विरुद्ध नरेंद्र मोदी, अमित शाहांनी घाणेरडा अपप्रचार केला होता. मेघालय हे देशातील सगळ्यात भ्रष्ट राज्य आहे. केंद्राच्या योजना मेघालयातील जनतेपर्यंत पोहोचत नाही. संगमाने गरिबांचा पैसा खाल्लेला आहे, असे आरोप केले आणि आता परत काही झालंच नाही, अशा लाचारपणाने पुन्हा संगमांसोबत जाऊन बसले आहेत”, असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं.

MVA: कसब्याच्या निकालाने महाविकास आघाडी मजबूत केली? भाजपचं टेन्शन वाढणार!

“आपल्यासोबत येतील ते धुतले तांदूळ. चार दिवसांपूर्वी आम्ही पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यांच्यावर आरोप होते, ते पक्षात घेतले. त्यांच्यावर गौमुत्र शिंपडलं का? ते शुद्ध झाले का? आमच्या लोकांच्या मागे तुम्ही लागला आहात, त्यांनीही तुमच्या पक्षात यावं, अशी तुमची अपेक्षा आहे का? ते तुमच्या पक्षात आल्यावर शुद्ध झाल्याचं जाहीर करणार आहात का?”, असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना केला.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, ठाकरे काय म्हणाले?

“सत्तापिपासूपणा जनतेच्या लक्षात आला आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील लोकांना नामोहरम करायचं… पक्षात या नाहीतर तुरुंगात या, असं सुरू आहे. हर्षवर्धन पाटलांचं विधान आहे की, भाजपत गेल्यावर छान झोप लागते”, असं सांगत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT