Mumbai Local कधी सुरू होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…
महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मुंबईची लोकल ही सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याची. लाखो मुंबईकर लोकल सगळ्यांसाठी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सध्याच्या घडीला मुंबई लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रातील कोरोना निर्बंध शिथील झाल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती मुंबईची लोकल ही सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याची. लाखो मुंबईकर लोकल सगळ्यांसाठी सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत. सध्याच्या घडीला मुंबई लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिकेच्या जी पश्चिम कार्यालयाचं उद्घघाटन केलं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
‘लोक म्हणत आहेत की सगळीकडेच शिथीलता द्या. मात्र ते शक्य नाही. जिथे निर्बंध शिथील होऊ शकतात तिथे तसा निर्णय घेतला आहे. पण काही ठिकाणी नाईलाज आहे. मुंबईची लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. मुंबईच्या आसपास असणाऱ्या शहरांमधील कोरोना स्थितीचा अंदाज घेऊन जबाबदारीचं भान ठेवून लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
कोरोनाच्या संकट काळात मुंबई महापालिकेने चांगलं काम केलं असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच ज्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील झालेले नाहीत त्या जिल्ह्यांमधील व्यापाऱ्यांनी नियम मोडू नये आणि संयम सोडू नये असंही आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.
कोरोनाच्या काळात वाईट स्थिती असताना मुंबई महापालिका लोकांच्या मागे उभी राहिली. कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळेच हे शक्य झालं. आपल्या मुंबई मॉडेलचं कौतुक जगभरात झालं. धारावीने कोरोनाला हरवलं ही बाब निश्चितच स्तुत्य आहे. कोरोना संकटाचा सामना करत असतानाच मुंबईत विकासकामंही सुरू आहेत. जी पश्चिमचं कार्यालय दूरदृष्टी ठेवून केलं गेलं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT