‘अमृता फडणवीस या शुद्ध आणि पवित्र, पण…’, ठाकरेंचा ‘सामना’तून सवाल

मुंबई तक

Shiv Sena UBT, Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, Devendra fadnavis : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून सामनातून सवाल उपस्थित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकारही समोर आला. त्यावरून सामनातून गंभीर प्रश्न उपस्थित […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shiv Sena UBT, Uddhav Thackeray, Amruta Fadnavis, Devendra fadnavis : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. त्याचबरोबर शीतल म्हात्रे-प्रकाश सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणावरून सामनातून सवाल उपस्थित करण्यात आले आहे. अमृता फडणवीस यांना 1 कोटींची ऑफर आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकारही समोर आला. त्यावरून सामनातून गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “शिवसेनेसह विरोधी पक्षांतील अनेक आमदारांना अॅण्टी करप्शन म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या नोटिसा पाठवून चौकशांचा ससेमिरा मागे लावणे हे राजकीय सूडाचे लक्षण आहे. कोकणातले आमदार राजन साळवी व त्यांच्या कुटुंबीयांचा सरकारने असाच छळ चालवला आहे. आमदार वैभव नाईक, नितीन देशमुख यांनाही ‘अॅण्टी करप्शन’च्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. हे सर्व लोक मिंधे गटात सामील झाले नाहीत. त्यांनी आपले इमान विकले नाही. त्याची शिक्षा त्यांना दिली जात आहे. आता यावर फडणवीस हे नाकाने कांदे सोलत सांगतील की, ‘कर नाही त्याला डर कशाला?”

कुल यांना नोटीस पाठवली आहे काय?, ठाकरे गटाचा सवाल

“फडणवीस तुमचे बरोबर आहे, पण ‘डर’ आम्हाला नसून तुमच्या लोकांना आहे व तुमच्याच संरक्षणाखाली भ्रष्टाचाराचे कुरण फुलले आहे. दौंडच्या भीमा पाटस साखर कारखान्याचा 500 कोटींचा घोटाळा समोर आला. शेतकऱ्यांचा पैसा भाजप आमदार कुल यांनी ‘हडप’ केला. त्या पैशांचा अपहार झाल्याचे उघड होऊनही फडणवीस हे आमदार कुल यांची वकिली करताना दिसतात. तुमच्या त्या ‘अॅण्टी करप्शन ब्युरो’, ‘इकॉनॉमिक ऑफेन्स विंग’ या भ्रष्टाचार संरक्षण मंडळाने श्रीमान कुल यांना नोटीस पाठवली आहे काय?”, असा सवाल ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

Amruta Fadnavis यांना 1 कोटीची लाच देण्याची ऑफर; तरुणीला अखेर अटक

हे वाचलं का?

    follow whatsapp