Uddhav Thackeray च्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपला, आता पुढे काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray News : शिंदे गटासोबत सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आणि केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) लढा देणाऱ्या उद्धव ठाकरेंसमोर (Uddhav Thackeray) आता नवा मुद्दा निर्माण झालाय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नसल्यानं आता पुढे काय होणार, हा मुद्दा आता चर्चेत आलाय. याबद्दल घटनातज्ज्ञ उल्हास बापट (ulhas bapat constitutional expert) यांनी कायदेशीर बाबी विशद केल्या आहेत.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांनी बंडानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दावा केलेला आहे. हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात आहे. निवडणूक आयोगासमोर सध्या या प्रकरणावर सुनावणी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ 23 जानेवारी रोजी संपत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढे काय होईल? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून कायम राहणार की, त्यांना पायउतार व्हावं लागणार का? निवडणुका घ्याव्या लागणार का? असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होताहेत.

हे वाचलं का?

शिव-भीमशक्तीची युती: ‘…म्हणून आम्ही एकत्र आलोय’, ठाकरेंचं मोठं विधान

यासंदर्भात मुंबई Takने घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला. उल्हास बापट म्हणाले, “शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ जरी आज संपत असेल, तरी निवडणूक घेण्याची आज आवश्यकता किंवा अनिवार्य नाही.”

ADVERTISEMENT

यामागचं कारण सांगताना उल्हास बापट म्हणाले, “कारण दोन्ही विषय सध्या न्यायालयात आहेत. जरी कायद्यात याविषयी काही नियम दिलेले नसले, तरी इंग्लंडमध्ये जे पक्ष राजकीय पार्टीसाठी नियम दिले आहेत, तेच आपण भारतात लागू करतो.”

ADVERTISEMENT

उल्हास बापट असंही म्हणाले, “जोपर्यंत पक्षप्रमुखाची निवडणूक होत नाही, तोपर्यंत वर्तमान अध्यक्षच पक्षाचा प्रमुख असतो. या काळात कोणतेच मोठे निर्णय घेता येत नाही”, असं उल्हास बापट यांनी स्पष्ट केलं.

कसबा पोटनिवडणूक 2023 : पुन्हा कमळ फुलवण्यासाठी भाजपची ‘समिती’ रणनीती!

Uddhav Thackeray : 2013 पासून ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख

उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदालाही शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात आव्हान दिलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी बेकायदेशीर मार्गाने पक्षाच्या घटनेत बदल केल्याचं शिंदे गटाने म्हटलेलं आहे.

आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे उद्धव ठाकरे हे 2013 पासून शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. 17 नोव्हेंबर 2012 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने पक्षप्रमुख हे पद निर्माण करून उद्धव ठाकरे यांची निवड या पदावर केली होती.

23 जानेवारी 2013 रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनीच उद्धव ठाकरेंची निवड झाली होती. त्यानंतर 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्यकारिणीने पक्षप्रमुख म्हणून पुन्हा निवड केली होती. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT