उद्धव ठाकरे की, एकनाथ शिंदे… जनतेच्या कोर्टात कुणाचा दसरा मेळावा ठरला भारी?
Shiv Sena Dasara Melava 2022 : ठाकरे-शिंदेंची सध्या कोर्टात, निवडणूक आयोगात लढाई सुरूये. या लढाईचा निकाल कधी लागेल, हे अजून स्पष्ट नाही. पण जनतेच्या कोर्टाने निकाल दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं शक्तिप्रदर्शन म्हणून शिवसेनेच्या ज्या दसरा मेळाव्यांकडे बघितलं गेलं, ते दोन्ही मेळावे झाले. दोघांनीही तोडीसतोड गर्दी जमवली. पण या शक्तिप्रदर्शनाच्या स्पर्धेत जनतेच्या कोर्टात कोण जिंकलं, […]
ADVERTISEMENT
Shiv Sena Dasara Melava 2022 : ठाकरे-शिंदेंची सध्या कोर्टात, निवडणूक आयोगात लढाई सुरूये. या लढाईचा निकाल कधी लागेल, हे अजून स्पष्ट नाही. पण जनतेच्या कोर्टाने निकाल दिलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं शक्तिप्रदर्शन म्हणून शिवसेनेच्या ज्या दसरा मेळाव्यांकडे बघितलं गेलं, ते दोन्ही मेळावे झाले. दोघांनीही तोडीसतोड गर्दी जमवली. पण या शक्तिप्रदर्शनाच्या स्पर्धेत जनतेच्या कोर्टात कोण जिंकलं, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं पाच निकषांच्या आधारे घेतलेला हा आढावा…
ADVERTISEMENT
शिवसेनेतल्या फाटाफुटीनंतरचा पहिला दसरा मेळावा ५ ऑक्टोबरला झाला. जसे दोन गट पडलेत, तसेच दोन दसरा मेळावेही झाले. उद्धव ठाकरेंनी दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कावर संबोधित केलं. तर एकनाथ शिंदेंचा पहिलावहिला मेळावा बीकेसीवर झाला. एकमेकांना मात देण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली. आणि याच तयारीचा आता निकाल लागलाय. पण जनतेच्या कोर्टातला हा निकाल समजून घेताना डोक्याचं पुरतं भजं होतंय. त्यामुळेच आपण पाच निकषांच्या आधारे हा निकाल कोणाच्या बाजूने लागलाय, ते समजून घेणार आहोत.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : पहिला निकष आहे, गर्दी
दोन्ही बाजूंमध्ये गर्दी जमवण्यासाठी जणू काही शर्यतच लागली होती. ८० हजाराची क्षमता असलेल्या शिवाजी पार्कवर ठाकरेंकडून दीड लाख लोक जमवण्याचा दावा करण्यात आला. तर लाखभर क्षमतेच्या बीकेसीवर शिंदेंनी तीन-चार लाख लोक जमवण्याची तयारी केली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, बीकेसीवर तब्बल दोन लाखांची, तर शिवाजी पार्कवर एक लाखाची गर्दी जमली. गर्दीच्या या स्पर्धेत एकनाथ शिंदेंनी एकहाती विजय मिळवला.
हे वाचलं का?
Kishori Pednekar: “एकनाथ शिंदेंच्या भाषणाची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांनीच लिहून दिली”
Shiv Sena Dasara Melava 2022 : दुसरा मुद्दा आहे, गर्दी आली की आणली?
ठाकरे-शिंदेंमध्ये गर्दीवरून दावे-प्रतिदावे केले जात होते. शेवटी शिंदेंनी बाजी मारली. पण शिंदेंच्या गर्दीवरून एक नवा प्रश्न निर्माण झालाय. गर्दी आणली की आली? शिंदे गटानं समर्थकांना आणण्यासाठी हजारो एसटी, खासगी बसेस बूक केल्या. याउलट ठाकरेंकडून अशी कोणतीच तयारी झाल्याचं दिसलं नाही. उद्धव ठाकरे समर्थक स्वकष्टाची भाजीभाकरी खाऊन, तिकीट काढून मुंबई गाठल्याचं सांगत होते. त्यामुळेच ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी कमी झाली, तरी ती शिंदेंच्या तुलनेत अधिक उत्स्फुर्त होती, असं म्हटलं जातंय. सभेला गर्दीतून जो रिस्पॉन्स मिळत होतो, त्यावरून उत्स्फुर्तता जोखली जातेय.
ADVERTISEMENT
शिवाजी पार्क विरुद्ध बीकेसी मैदान तिसरा मुद्दा आहे, सभा किती लोकांनी बघितली?
महाराष्ट्राची लोकसंख्या आहे, जवळपास ११ कोटी. आणि दोघांच्या सभेला लोक जमले, तीन लाख. मग सभेला येणं जमलं नाही, अशा लोकांनी सभा टीव्ही आणि डिजिटल मीडियावरून बघितली. टीव्हीवर किती प्रतिसाद मिळाला ही गोष्ट टीआरपीच्या आकड्यावरून कळते. पण डिजिटल आकडे तुम्ही सगळ्यांनी रिअल टाईम बघितलेत. वेगवेगळ्या युट्यूब चॅनेलवरून ठाकरे, शिंदेंच्या सभा लाईव झाल्या. त्यामध्ये काही अपवाद वगळले,तर ठाकरेंनी बाजी मारल्याचं आकडे सांगतात. उदाहरणादाखल आपण ‘मुंबई Tak’वरचे सभेचे आकडे घेऊया. ठाकरेंची सभा अडीच लाख लोकांनी बघितली, तर शिंदेंची सभा ४९ हजार लोकांनी बघितली. आता हे आकडे चॅनेलनिहाय बदलू शकतात. पण यात फारसा फरक नसल्याचं तुम्हाला वेगवेगळ्या चॅनेलचे आकडे बघितल्यावर कळेल.
ADVERTISEMENT
“एकनाथ शिंदे धादांत खोटं बोलत आहेत” दसरा मेळाव्यातल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत अजितदादा आक्रमक
शिवसेना विरुद्ध शिंदे गट : चौथा मुद्दा, भाषण
शिवसेनेकडून सांगितलं जातं, दसरा मेळावा म्हणजे विचारांचं सोनं लुटणं. ठाकरेंनी ४० मिनिटं भाषण केलं, तर शिंदेंचं भाषण दुप्पट म्हणजे तब्बल दीड तासांचं झालं. पण भाषण गाजलं कोणाचं, हे आपल्याला 2 गोष्टींवरून जोखता येतं. एक म्हणजे उपस्थितीतांचा रिस्पॉन्स. ठाकरेंच्या भाषणाला हा प्रतिसाद अधिक मिळाला. वेळोवेळी टाळ्या मिळत होत्या. दुसरी गोष्ट म्हणजे, सभेतली गर्दीची उपस्थिती. शिंदेंनी गर्दीत ठाकरेंना मात दिली. पण प्रमुख नेत्याचं, शिंदेंचं भाषण सुरू असतानाच लोक मोठ्या संख्येनं उठून जाऊ लागले. तसे व्हिडिओही व्हायरल झालेत. याउलट ठाकरेंच्या सभेत हे दृश्यं दिसलं नाही.
पाचवा आणि शेवटचा मुद्दा आहे, सभेचा फोकस कोण?
एक नेता, एक झेंडा, एक मैदान हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची टॅगलाईन. ही टॅगलाईन मेळाव्याचा फोकस कशावर असणार हे सांगतेय. शिवाजी पार्कवर ठाकरे हे उत्सवमूर्ती, तर बीकेसीवरील उत्सवमूर्ती शिंदे आहेत. पण शिंदे उत्सवमूर्ती असूनही मेळाव्याचा केंद्रबिंदू हलता राहिला. म्हणजे जिथे केवळ शिंदेंची चर्चा व्हायला हवी होती, तिथं जयदेव ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांच्या मंचावरील उपस्थितीबद्दलही बोललं गेलं. बाळासाहेबांची सावली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थापांनाही स्टेजवर बसवलं. दुसरीकडं फोकस आपल्यावरच ठेवण्यात ठाकरेंना यश आलं.
Dasara Melava: आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
एकूण सत्तांतरानंतरच्या जनतेच्या कोर्टातल्या लढाईत शिंदे गर्दीत जिंकले, पण गर्दीतून सभेचं गणित जमवण्यात त्यांना तेवढं यश आलं नाही. आणि हीच गोष्ट ठाकरेंनी साधली. त्यामुळे सुरवातीपासून बॅकफूटवर असलेले ठाकरे शेवटच्या क्षणी आघाडीवर गेले आणि दसरा मेळाव्याचं मैदान मारलं. दसरा मेळावा सभेबद्दल लोकांना काय वाटतं, जनतेच्या कोर्टातल्या लढाईचा हा निकाल शिंदेंसाठी धोक्याची घंटा आहे का? या प्रश्नांची उत्तर आगामी काळात मिळतीलच.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT