Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन गवळी जेलमधून कायमचा सुटणार? नेमकं ‘ते’ प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

What exactly is kamlakar jamsandekar murder case नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) अरुण गुलाब गवळी (Arun Gawali) याने वयाची 70 वर्षे पूर्ण केल्याच्या कारणावरून जेलमधून मुदतपूर्व सुटकेसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी हा शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर (Kamlakar Jamsandekar) यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. (underworld don arun gawli moved high court for early release from jail what exactly is kamlakar jamsandekar murder case)

ADVERTISEMENT

अरुण गवळी याने 14 वर्षे कारावासाची शिक्षा पूर्ण केली आहे. त्यामुळे आता शिक्षा माफी मिळून आपली तुरुंगातून मुदतपूर्व सुटका करावी अशी प्रार्थना त्याने केली आहे.

20 जानेवारी, 2006 च्या शासन अधिसूचनेनुसार 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा पूर्ण केल्यानंतर आरोपी हा मुक्त होण्यास पात्र आहे. कारण त्याने वयाची 65 वर्षांहून अधिक वर्षे पूर्ण केली आहेत आणि तो वृद्धापकाळाने आजारी आहे. असा दावा अरुण गवळीच्या वतीने कोर्टात करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी मिनेझिस यांच्या खंडपीठाने अरुण गवळी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर संबंधित विभागाला आणि प्रशासनाला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता 15 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. अरुण गवळीच्या बाजूने वकील मीर नगमान अली यांनी न्यायालयात बाजू मांडत आहेत.

नेमक्या कोणत्या प्रकरणात जेलमध्ये आहे अरुण गवळी?

अरुण गवळी हे संघटीत गुन्हेगारीतील कुख्यात नाव आहे. त्याने त्याच्या तरुण वयापासूनच अनेक हत्या, खंडणी, गैरव्यवहार केल्याचे त्याच्यावर आरोप केले जात होते. मात्र तरीही एका अशा प्रकरणात तो अडकला की, ज्यामुळे त्याला थेट जन्मठेपेची शिक्षा झाली. आता ते नेमकं प्रकरण काय होतं हे आपण समजून घेऊया.

ADVERTISEMENT

मुंबईच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या मोहिली व्हिलेज येथे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची त्यांच्या राहत्या घरात गोळ्या झाडून 4 जणांनी हत्या केली होती. मात्र, या सगळ्या प्रकरणात अतिशय नाट्यमयरित्या अरुण गवळी याची एंट्री झाली होती.

ADVERTISEMENT

Pradeep Gawali: गँगस्टर अरुण गवळीच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

सुरुवातीला ही हत्या अरुण गवळीच्या आदेशावरून झाली असावी असा कोणालाही मागमूस नव्हता. मात्र, जवळजवळ एका वर्षानंतर अटक एका दरोडेखोरीच्या प्रकरणात अटक केलेले आरोपी हेच जामसांडेकरांच्या हत्येतील मारेकरी आहेत हे जेव्हा समोर आलं तेव्हा या संपूर्ण प्रकरणाला अचानक गती मिळाली.

मारेकऱ्यांना हे देखील माहित नव्हतं की, त्यांनी अरुण गवळीच्या इशाऱ्यावरून ही हत्या केली आहे. कारण त्यांना हत्येची सुपारी प्रताप गोडसे नावाच्या व्यक्तीने दिली होती. विजय गिरी, नरेंद्र गिरी आणि अशोक जयस्वाल या तीन जणांनी जामसांडेकरांवर गोळ्या झाडल्या होत्या.

अरुण गवळीच्या दगडी चाळीवर म्हाडा उभारणार ४० मजली टॉवर

खरं तर जामसांडेकरांच्या हत्येची मूळ सुपारी ही बांधकाम व्यावसायिक असलेल्या सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी दिली होती. असं असताना अरुण गवळीचा या हत्येशी नेमका काय संबंध होता हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

सदाशिव सुर्वे, साहेबराव भिंताडे यांचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्याशी काही वाद होते. त्यामुळेच या दोघांनी जामसांडेकर यांना कायमचं संपवण्याचा कट रचला. आपल्याला थेट जामसांडेकरांची हत्या करता येणार नाही हे ओळखून त्यांनी प्रताप गोडसे आणि गवळी गँगच्या स्थानिक गुंडांच्या मदतीने सगळ्यात आधी थेट ‘दगडी चाळ’ गाठली.

जामसांडेकरांच्या हत्येसाठी सुर्वे आणि भिंताडे यांनी अरूण गवळीच्या अत्यंत मर्जीतील आणि विश्वासू समजल्या जाणाऱ्या सुरेश पाटील याची भेट घेऊन त्याला तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर या हत्येचं संपूर्ण प्लॅनिंग हे अरूण गवळीच्या इशाऱ्यानुसार झालं. त्यानंतर शेवटचा आदेश देत गवळीने जामसांडेकरांची हत्या घडवी आणली.

मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधवचे गवळी गँगशी संबंध? काय म्हणाल्या आशा गवळी?

धक्कादायक बाब म्हणजे जेव्हा अरूण गवळीने जामसांडेकरांच्या हत्येची सुपारी घेतली तेव्हा तो भायखळा मतदारसंघाचा विधानसभेत निवडून गेलेला आमदार होता. त्यामुळेच एका आमदाराला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्याआधी पोलिसांनी प्रचंड सबळ पुरावे आणि साक्षीदार जमा केले आणि त्याच बळावर त्यांनी गवळीला थेट दगडी चाळीतून अटक केली.

Underworld Don अरूण गवळी होणार ग्रॅज्युएट, BA च्या अंतिम वर्षाची परीक्षा पास करण्यासाठी दोन पेपर बाकी..

या अटकेनंतर कोर्टात अरुण गवळीवर खटला चालविण्यात आला. ज्यानंतर कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेव्हापासून आजपर्यंत गवळी हा शिक्षा भोगत आहे. गवळी हा अनेकदा आतापर्यंत पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, त्याची शिक्षा ही कायम आहे. पण आता ही शिक्षा पूर्णपणे माफ करण्यात यावी यासाठीच गवळीने कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT