खळबळजनक घटना : तपोवन एक्स्प्रेसच्या खिडकीला गळफास घेऊन एकाची आत्महत्या

मुंबई तक

नांदेड रेल्वे स्थानकात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या तपोवन एक्स्प्रेसच्या डब्यातील खिडकीला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे. नांदेडवरुन तपोवन एक्सप्रेस रोज सकाळी मुंबईला जाते. आज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नांदेड रेल्वे स्थानकात आज एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या तपोवन एक्स्प्रेसच्या डब्यातील खिडकीला गळफास लावून एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

नांदेडवरुन तपोवन एक्सप्रेस रोज सकाळी मुंबईला जाते. आज सकाळी नऊ वाजल्याच्या दरम्यान एका डब्यातील शौचालयाच्या बाहेरील बाजूने खिडकीला एका व्यक्तीने आपल्या रुमालाने गळफास तयार करुन आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी या मृतदेहाला ताब्यात घेतलं असून त्याची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

मुंबई : बायकोची हौस पुरवण्याच्या नादात पडल्या बेड्या, सीसीटीव्हीत हातावरील टॅटू दिसला अन्…

या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडाली असून हा व्यक्ती नेमका कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत. नेमका हा व्यक्ती रेल्वे स्टेशनमध्ये येऊन कधी त्याने गळफास घेतला याचा तपास केला जातो आहे. अज्ञात व्यक्तीची रंग सावळा, चेहरा गोल, साधारण साडेपाच फूट उंची, बारिक दाढीमिशी, सडपातळ बांधा, अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट आणि निळी पँट अशी ओळख आहे. विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात या व्यक्तीवर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp