Maharashtra Rain : राज्याला ड्रायव्हर नको, लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा-राणे
कोकणातल्या विविध भागात मुसळधार पावसाचं थैमान घातलं आहे. चिपळूण शहरात सर्वात जास्त हाहाकार उडाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र […]
ADVERTISEMENT
कोकणातल्या विविध भागात मुसळधार पावसाचं थैमान घातलं आहे. चिपळूण शहरात सर्वात जास्त हाहाकार उडाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. बाजारपेठ, अनेक घरं पूर्ण पाण्याखाली गेली आहेत. अशावेळी नागरिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्याची गरज व्यक्त केली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केंद्र सरकार हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
राज्याला चांगला ड्रायव्हर नको, चांगला मुख्यमंत्री हवा असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. मुख्यमंत्री गाडी चालवत पंढरपूरला गेले. पण दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांकडे, त्यांच्या कुटुंबीयांकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही. राज्याला ड्रायव्हर नको आहे तर चांगला मुख्यमंत्री हवा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. कॅबिनेटला जायचं नाही आणि पंढरपूरला जायचं यात काय भूषण आहे, असा खोचक टोला नाराय राणे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात मागील 24 तासांमध्ये कोसळधार सुरूच आहे. खासकरून रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आणि मुसळधार पावसाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तसंच बचावकार्य करणाऱ्या सगळ्या यंत्रणांनी सतर्क राहून काम करावं असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. यावेळी बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT