नारायण राणे यांच्या गाडीवर ड्यूटी असलेल्या चालकाचा मृत्यू; कुटुंबीयांनी केला गंभीर आरोप
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. मात्र मयत चालकाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मेडिकल रजेवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. अशोक कुमार वर्मा हे उत्तर प्रदेशातील […]
ADVERTISEMENT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गाडीचालकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. मात्र मयत चालकाच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. मेडिकल रजेवर असतानाही निलंबित करण्याची धमकी देऊन ड्युटीवर बोलवल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
अशोक कुमार वर्मा असं मृत्यू झालेल्या चालकाचं नाव आहे. अशोक कुमार वर्मा हे उत्तर प्रदेशातील राज्य स्थावर विभागात चालक म्हणून कार्यरत होते. नारायण राणे लखनौच्या दौऱ्यावर असताना अशोक कुमार यांची नारायण राणे यांच्या गाडीवर ड्यूटी लावण्यात आली होती.
ड्यूटीवर असताना अशोक कुमार यांना ह्रदयविकासाचा झटका आला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचपर्यंत त्यांच्या मृत्यू झाला. अशोक कुमार वर्मा यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत.
‘अशोक कुमार यांची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्यांनी वैद्यकीय रजा घेतलेली होती. पण, केंद्रीय मंत्री (नारायण राणे) दौऱ्यावर आल्यानंतर वैद्यकीय रजेवर असतानाही त्यांना बळजबरीने ड्यूटीवर बोलावून घेण्यात आलं’, असा आरोप कुटुंबीय व नातेवाईकांनी केला आहे.









