Nitin Gadkari: “सायरस मिस्त्रींचं अपघाती निधन दुर्दैवी, अहमदाबाद मुंबई हायवे खूपच धोकादायक”

मुंबई तक

रस्ते सुरक्षा या विषयावर नितीन गडकरी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. तसंच त्यांनी वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांनी कारमध्ये असणाऱ्या सेफ्टी फिचर्सबाबतही वक्तव्य केलं. भारतात सहा एअरबॅगवाल्या कार आम्ही आणतो आहोत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच सीट बेल्ट न लावणंही चुकीचं आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. इंडिया टुडेच्या विशेष कार्यक्रमात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रस्ते सुरक्षा या विषयावर नितीन गडकरी यांचं वक्तव्य समोर आलं आहे. तसंच त्यांनी वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांनी कारमध्ये असणाऱ्या सेफ्टी फिचर्सबाबतही वक्तव्य केलं. भारतात सहा एअरबॅगवाल्या कार आम्ही आणतो आहोत असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे. तसंच सीट बेल्ट न लावणंही चुकीचं आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे. इंडिया टुडेच्या विशेष कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सायरस मिस्त्रींसोबत गाडीत होते एकाच कुटुंबातील तिघे; गाडी चालवणाऱ्या त्या प्रसिद्ध डॉक्टर कोण?

अहमदाबाद मुंबई हायवे खूपच धोकादायक

इंडिया टुडेशी चर्चा करताना नितीन गडकरींना सायरस मिस्त्रींच्या अपघाती निधनाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी नितीन गडकरी म्हणाले, अहमदाबाद-मुंबई हायवे खूप भयानक आहे. तिथे ट्रॅफिक PCU १.२० लाख आहे हे प्रमाण घटवून आम्हाला २० हजार PCU पर्यंत आम्हाला कमी करायचं आहे असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे. २०२४ पर्यंत सरकार रस्ते अपघातांचं प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करण्याचं उद्दीष्ट समोर ठेवतं आहे. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानदंड आहेत ते पाळले जातील असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं.

80,000 कोटींची संपत्ती मागे सोडून गेले सायरस मिस्त्री!

हे वाचलं का?

    follow whatsapp