पडघा : बंदूक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना लुटलं, घटना सीसीटीव्हीत कैद
भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैश्यांची बॅग आणि मोबाईल पळवून नेण्यात आलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पडघा पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. एफआयआरमध्ये पोलिसांनी या घटनेचा उल्लेख करताना लोखंडी पाईपसारख्या वस्तूचा वापर झाल्याचं नमूद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय. रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची […]
ADVERTISEMENT

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याजवळील पैश्यांची बॅग आणि मोबाईल पळवून नेण्यात आलं आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पडघा पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
एफआयआरमध्ये पोलिसांनी या घटनेचा उल्लेख करताना लोखंडी पाईपसारख्या वस्तूचा वापर झाल्याचं नमूद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
रत्नागिरी : रेल्वे व्यापाऱ्याची 27 लाखांची रोकड लुटणाऱ्या टोळीला अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडघा येथील डोहाले येथील जाई पेट्रोल पंप आहे. सात मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक सिल्व्हर रंगाच्या Activa गाडीवरुन तीन तरुण पेट्रोल पंपावर आले. या तरुणांनी बंदूकीचा धाक दाखल कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देत पैश्यांची मागणी केली.