मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, चाकरमान्यांची मोठी तारांबळ
Unseasonal Rain : राज्यात आज पहाटे मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने (unseasonal rain) दमदार हजेरी लावली होती. मुंबईसह ठाणे,वसई-विरार, पालगर, कल्याण-डोबिवली भागात आज पहाटे दमदार पाऊस पडला.या पावसामुळे सकल भागात पाणी साचले होते. तसेच या पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या (farmer) चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला […]
ADVERTISEMENT
Unseasonal Rain : राज्यात आज पहाटे मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने (unseasonal rain) दमदार हजेरी लावली होती. मुंबईसह ठाणे,वसई-विरार, पालगर, कल्याण-डोबिवली भागात आज पहाटे दमदार पाऊस पडला.या पावसामुळे सकल भागात पाणी साचले होते. तसेच या पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या (farmer) चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे.(unseasonal rain in mumbai palghar kalyan dombivali vasai virar since mide night)
ADVERTISEMENT
मुंबईसह ठाणे, पालघर, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली परीसरात आज पहाटेपासूनच पावसाने (unseasonal rain) हजेरी लावली होती. मुंबईच्या गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. तसेच मुंबई उपनगरातील वसई-विरार, पालघरमध्येही पावसाने (unseasonal rain) दमदार हजेरी लावली होती.यासह ठाणे, कल्याण-डोंबिवली भागात अवकाळी पाऊस पडला होता. या पावसामुळे चारकमान्यांचे मोठे हाल झाले होते.चाकरमान्यांना ट्रेन पकडण्यास किंवा बस अथवा पायी जाण्यास मोठी कसरत करावी लागली होती.
अवकाळी पावसाचा शेतीला मोठा फटका
अवकाळी पावसाचा (unseasonal rain) शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. त्यामु्ळे पिकांना मोठा फटका बसणार असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) २५ जिल्ह्यातील एक लाख ३९ हजार हेक्टरवर शेती पिकांच नुकसान झाल्याची माहिती आहे.
हे वाचलं का?
गारपिटीमुळे शेती पिकांच मोठं नुकसान
राज्यात गेल्या आठवडाभरापासून झालेल्या गारपीठीमुळे देखील शेतीच अतोनात नुकसान झाले आहे.काढणीसाठी आलेली पिके पुर्णत खराब झाली आहेत.द्राक्षे, केळी,डाळींब, गहू, कापसाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान बदलामुळे शेती पिकांना फटका बसत आहे.तसेच अचानक झालेल्या या वातावरणातील बदलामुळे आरोग्यावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण कर्नाटकापासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगड पर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे आज विदर्भाच्या काही भागात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यका आहे.उर्वरीत राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT