UP Exit Poll : एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला १ ते ३ जागा; प्रियंका गांधी म्हणतात…
देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेसची कामगिरी फारशी समाधानकारक राहणार नसल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यातून समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील एक्झिट पोलच्या आकड्यांबद्दल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचं सातव्या […]
ADVERTISEMENT

देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचं सरकार येत असल्याचं दिसत आहे. तर काँग्रेसची कामगिरी फारशी समाधानकारक राहणार नसल्याचं एक्झिट पोलच्या आकड्यातून समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील एक्झिट पोलच्या आकड्यांबद्दल काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी भाष्य केलं आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीचं सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा ‘योगी’चं सरकार येणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे. तर काँग्रेसला १ ते ३ जागाच मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजाबद्दल ‘इंडिया टुडे’शी बोलताना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘उत्तर प्रदेशात काँग्रेस उमेदवारांनी बऱ्याच कालावधीनंतर ४०० जागांवर निवडणूक लढवली आहे. निकाल काय येतो ते पाहू, पण काँग्रेसने खूप मेहनत घेतली. त्यामुळे याबद्दल जोपर्यंत निकाल येत नाही, तोपर्यंत काहीही सांगू शकत नाही,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
भाजप २८८ ते ३२६ जागा जिंकण्याचा अंदाज