दिशा सालियन मृत्यू: आदित्य ठाकरे शिंदेंच्या रडारवर; विधानसभेत गदारोळ
राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गटाने केली. नितेश राणेही आक्रमक झाल्यानं विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. शिवसेना बंडखोर आमदारांना सातत्यानं डिवचणारे आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या रडावर आलेत. लोकसभेत शिंदे गटाचे खासदार […]
ADVERTISEMENT
राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण लोकसभेत उपस्थित केल्यानंतर शिंदे गटाने याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंना घेरण्याचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसत आहे. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गटाने केली. नितेश राणेही आक्रमक झाल्यानं विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.
ADVERTISEMENT
शिवसेना बंडखोर आमदारांना सातत्यानं डिवचणारे आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या रडावर आलेत. लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी थेट एयू चा अर्थ आदित्य उद्धव होतो, असा दावा केला. त्यानंतर आता हे प्रकरण शिंदे गटाने विधानसभेत उचललं. दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न आता शिंदे गटाकडून होत आहे.
विधानसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरण मांडलं. “दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांना करू दिली नाही. दिशा सालियनचा मृत्यू कुठल्या परिस्थितीत झाला याची चौकशी व्हावी,” अशी मागणी भरत गोगावलेंनी केली.
हे वाचलं का?
‘फक्त आदित्य ठाकरेंचंच नाव का घेतात?’, नितेश राणेंनी केली मोठी मागणी
दिशा सालिनय प्रकरण : भरत गोगावलेंनी काय केली मागणी?
गोगावले म्हणाले, “दिशा सालियने आत्महत्या केली की तिला फेकून दिलं याची निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले नाहीत. दिशा सालियन ही सुशांतसिंह राजपूतचं काम पाहत होती. दोघांमधील मोबाईल संभाषण आणि चॅट्स उघड न होणे, सदर विषयात दिशा सालियनने सुशांतसिंग राजपूतला फोटो पाठवले होते, त्यानंतर दिशाचा संशयास्पद मृत्यू. त्यानंतर सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला.”
ADVERTISEMENT
“त्याच्या मृत्यूमध्ये सीबीआयने कोणताही निष्कर्ष काढलेला नाही. त्यामुळे दोन्ही मृत्यूंमध्ये काही साम्य असल्याचं आम्हाला वाटतंय. दिशा सालियनचा पोस्टमार्टेम रिपोर्ट उघड झालेला नाही. दिशा सालियनच्या मोबाईलमधील संभाषणाची चौकशी होणे आवश्यक आहे. दिल्लीपासून इथेपर्यंत हे प्रकरण गाजतंय. यात खुलासा व्हायला पाहिजे. फेर तपास होणं गरजेचं आहे,” असं भरत गोगावलेंनी विधानसभेत सांगितलं.
ADVERTISEMENT
Rahul Shewale : माझ्या बदनामीमागे आदित्य ठाकरे! त्यांनी मला संस्कृती शिकवू नये
Disha salian death case : त्या फोटोत दिसणारा मंत्री कोण? राणेंचा सवाल
त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी चौकशीची मागणी केली. “2020 पासून हा विषय महाराष्ट्रात चालू आहे. एका मुलीची संशयास्पद हत्या होते. त्याची चौकशी मुंबई पोलीस करत आहे. त्या चौकशी वेळी दोनदा आयोग बदलला गेला. 8 आणि 9 च्या रात्री कोणकोण होतं? कुणाच्या दबावामुळे ती केस बंद केली गेली? कशाला लपवलं जातंय? कुठला मंत्री त्या रात्री होता? सरकारने चौकशी करावी,” असं नितेश राणे विधानसभेत म्हणाले.
“दिशा सालियनने सुशांतसिंगला फोटो पाठवला. त्यामुळे सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू झाला. याची माहिती मुंबई पोलिसांनाही आहे. फोटोत कोण होता, त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली. कोण होता त्या फोटोमध्ये. कुणाला वाचवलं जातं आहे,” असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
राहुल शेवाळे विरुद्ध आदित्य ठाकरे : सुशांतसिंह राजपुत प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांची राळ
शिंदे गट आणि नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणाची मागणी केली. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू झाला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी दोन वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT