बारामती : अल्ताफ शेख यांनी साकार केलं आईवडिलांचं स्वप्न; ‘यूपीएससी’त मिळवलं उत्तुंग यश

मुंबई तक

यूपीएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली असून, प्रत्येकाची कहाणी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. नवोद्य विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या बारामती येथील अल्ताफ शेख यांनीही यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आईवडिलांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलंय. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

यूपीएससी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घातली असून, प्रत्येकाची कहाणी वेगळी आणि प्रेरणादायी आहे. नवोद्य विद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेल्या बारामती येथील अल्ताफ शेख यांनीही यूपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवलं आहे.

घरची परिस्थिती बेताची असतानाही देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकाने थेट आयपीएस बनवण्याचं आईवडिलांचं स्वप्न सत्यात उतरवून दाखवलंय. बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील अल्ताफ शेख यांनी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे.

सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या अल्ताफ शेख यांचा संघर्षही इतरांप्रमाणेच होता. शाळेत असताना कुटुंबीयांना मदत व्हावी म्हणून त्यांनी भजी व चहा विक्रीचंही काम केलेले अल्ताफ आता थेट आयपीएस बनले आहेत. बारामती तालुक्यातील पहिलेच आयपीएस अधिकारी बनण्याचा मान त्यांनी प्राप्त केला आहे.

UPSC चे निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला, जाणून घ्या महाराष्ट्राची किती नावं?